जैन बोर्डिंगसाठी १ नोव्हेंबर रोजी निघणाऱ्या मोर्चात सहभागी होणार - रवींद्र धंगेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 11:14 IST2025-10-28T11:13:54+5:302025-10-28T11:14:19+5:30

जैन बोर्डिंगला माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी भेट देऊन जैनमुनी आचार्य गुप्तीनंद महाराज यांचे आशीर्वाद घेतले

Will participate in the march on November 1st for Jain boarding - Ravindra Dhangekar | जैन बोर्डिंगसाठी १ नोव्हेंबर रोजी निघणाऱ्या मोर्चात सहभागी होणार - रवींद्र धंगेकर

जैन बोर्डिंगसाठी १ नोव्हेंबर रोजी निघणाऱ्या मोर्चात सहभागी होणार - रवींद्र धंगेकर

पुणे: पुण्यातील मॉडेल कॉलनीतील जैन बोर्डिंगची जागा वाचवण्याचे श्रेय जैन मुनी, विद्यार्थी समिती, माजी खासदार राजू शेट्टी आणि या लढ्यात सहभागी झालेल्या पुणेकरांचे आहे. या जागेसाठी येत्या १ नोव्हेंबर रोजी निघणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे, अशी माहिती माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिली.

जैन बोर्डिंगला माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी भेट देऊन जैनमुनी आचार्य गुप्तीनंद महाराज यांचे आशीर्वाद घेतले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांत तोडगा निघेल, असे सांगितले होते; त्यामुळे ते दोन दिवस या प्रकरणावर बोलणार नाहीत. या जागेचा व्यवहार रद्द झाल्यामुळे त्यांना आनंद झाला आहे. गैरव्यवहाराच्या विरोधात सर्व पुणेकर एकत्रितपणे लढले असून, त्यामुळे हा लढा यशस्वी झाला आहे, असे ते म्हणाले.

त्यांना मंत्री उदय सामंत यांचा फोन आला होता. एका वृत्तवाहिनीने त्यांच्या वक्तव्याची मोडतोड करून ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या बाबतीत चुकीचे बोलले असल्याचे दाखवल्याबद्दल धंगेकर यांनी स्पष्ट केले की, त्यांनी आणि त्यांच्या आवारातील लोकांनी शाह यांच्याबद्दल अशा प्रकारचे कोणतेही वक्तव्य केलेले नाही आणि ते कधीच करणार नाहीत. जे त्यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न केला गेला आहे ते चुकीचे आहे, असे त्यांनी नमूद केले.

जैन मंदिराविषयी आदर : गोखले

मॉडेल कॉलनी येथील जैन बोर्डिंग या जागेच्या व्यवहारादरम्यान आम्ही कोणतेही गैरकायदेशीर काम केलेले नाही, असे गोखले कंस्ट्रक्शन्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विशाल गोखले यांनी सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, या जागेवर ५० हजार चौरस फुटांचे नवीन वसतिगृह बांधणे आणि तेथील जैन मंदिर तसे जतन करणे यासाठी त्यांनी कटिबद्धता दर्शवली होती. जैन बांधवांच्या या मंदिराविषयी असलेल्या भावनांचा त्यांना आदर आहे, त्यामुळे या प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

 

 

 

 

Web Title: Will participate in the march on November 1st for Jain boarding - Ravindra Dhangekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.