शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळ होऊ देणार नाही

By admin | Updated: September 25, 2016 04:45 IST

पुरंदर तालुक्यात होणाऱ्या प्रस्तावित विमानतळाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी असल्याची घोषणा केली असली, पुरंदर तालुक्यातील कोणत्या गावात होणार याविषयी संदिग्धता

राजेवाडी : पुरंदर तालुक्यात होणाऱ्या प्रस्तावित विमानतळाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी असल्याची घोषणा केली असली, पुरंदर तालुक्यातील कोणत्या गावात होणार याविषयी संदिग्धता असली, तरी राजेवाडी ग्रामस्थांनी तातडीची बैठक बोलावून राजेवाडी-वाघापूर येथे होणाऱ्या प्रस्तावित विमानतळाला विरोध केला आहे.विमातळासाठी राजेवाडी-वाघापूरला जागेची पाहणी झाल्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून राजेवाडीतील ग्रामस्थांची झोप उडाली होती. राजेवाडीतील संपूर्ण शेती घरादारासह विमानतळात जाणार असल्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले होते. ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामसभा बोलावण्यात आली होती. त्याही वेळी विमानतळाला विरोध करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरंदरमध्ये विमानतळाला एअरपोर्ट आॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या वतीने जाहीर केले असले, तरी शतकाऱ्यांची भूमिका ऐकून न घेता परस्पर निर्णय घेतला असल्याने गावातून संताप व्यक्त केला जात आहे. या वेळी बळीराजा संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय जगताप, हनुमंत थोरात, विलास कडलग, आनंदीबाई हराळे, माऊली बधे यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी सरपंच पुष्पांजली बधे, दत्तात्रय जगताप, विलास खेडेकर, संदीप जगताप उपस्थित होते. (वार्ताहर)मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रशासनाकडून शेतकऱ्यांशी बोलणी केल्याची खोटी माहिती दिली आहे. राजेवाडीतील कोणत्याही शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात आली नाही. यामुळे कोणत्याही परिस्थितीत विमानतळ होऊ देणार नसल्याचा निर्णय ग्रामस्थांनी ग्रामसभेत घेतला.