Will the BJP candidates win you ? who disrespect the martyred officers ? Prakash Ambedkar | शहीद अधिकाऱ्यांचा अवमान करणाऱ्या भाजप उमेदवारांना निवडून देणार का? प्रकाश आंबेडकर  
शहीद अधिकाऱ्यांचा अवमान करणाऱ्या भाजप उमेदवारांना निवडून देणार का? प्रकाश आंबेडकर  

पुणे ( धायरी) : मोदी सरकार हे खोटारडे सरकार आहे. नोटाबंदीमुळे भाजपावाले श्रीमंत झाले. त्याच्या हितसंबंधितांचा काळा पैसा पांढरा केला गेला. तसेच संविधान बदलण्याची भाषा भाजपा नेते करत आहेत. त्यामुळेच आमची लढाई संविधान वाचवण्यासाठी आह महाराष्ट्र पोलीस दलातील शहीद अधिकाऱ्यांचा अवमान करणाया भाजपा उमेदवारांना तुम्ही निवडून देणार का? असा सवाल आंबेडकर यांनी उपस्थितांना केला. 
 वडगाव बुद्रुक येथील शिंदे मैदानावर आज वंचित बहुजन आघाडीच्या बारामती मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारार्थ बाळासाहेब आंबेडकर यांची सभा पार पडली. मोदी सरकारवर चौफेर टीका केली. आंबेडकर म्हणाले, सत्ता डाव्या हातात काय किंवा उजव्या हातात काय शरीर मात्र एकच आहे. बारामतीमधील सुप्रिया सुळे व कांचन कुल नातेवाईक आहेत .घराणेशाहीला मतदान करू नका असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 
वंचित बहुजन आघाडी चे बारामती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नवनाथ पडळकर यांनी भाजप सरकार टीका केली . भाजपा प्रशासनावर दबाव टाकून विरोधकांच्या सभांना परवानग्या नाकारणे, विलंब लावणे तसेच सभा होऊ न देणे अशा प्रकारचे षडयंत्र करत आहे याची तक्रार निवडणुक आयोगाचे पुणे जिल्हा निरीक्षक यांच्याकडे केली आहे.असे सांगितले
     यावेळी भारिप अध्यक्ष उत्तम वनशिव,बाळासाहेब कांबळे ,रामभाऊ मरगळे ,अरविंद तायडे, महिला अध्यक्ष सीमा भालसेन , उज्वला पंचमुख, अमृता आलदर व आदी मान्यवर उपस्थित होते.


Web Title: Will the BJP candidates win you ? who disrespect the martyred officers ? Prakash Ambedkar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.