शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

गुन्ह्यांबाबत जनजागृती करण्यासाठी सायबर शाखेचा वुईफाईटसीसी उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2017 8:06 PM

तंत्रज्ञानाच्या युगात दिवसेंदिवस इंटरनेट आणि सोशल माध्यमाचा वापर वाढत असताना त्याच्याबरोबरीने सायबर गुन्हयांचे प्रमाणही वाढत चालले आहे. या गुन्हयांमध्ये युवा वर्गाचा सहभाग लक्षणीय असून, अल्पवयीन विद्यार्थीही गुन्हयांचे बळी ठरत आहेत.

पुणे: तंत्रज्ञानाच्या युगात दिवसेंदिवस इंटरनेट आणि सोशल माध्यमाचा वापर वाढत असताना त्याच्याबरोबरीने सायबर गुन्हयांचे प्रमाणही वाढत चालले आहे. या गुन्हयांमध्ये युवा वर्गाचा सहभाग लक्षणीय असून, अल्पवयीन विद्यार्थीही गुन्हयांचे बळी ठरत आहेत. सायबर गुन्हयाबाबत विद्यार्थी आणि शिक्षक अनभिज्ञ असल्याने या गुन्हयांना कशाप्रकारे सामोरे जावे याची माहिती नसते. त्यामुळे सायबर गुन्ह्यांबद्दल जनजागृती करण्यासाठी, यापासून परावृत्त करण्यासाठी पुणे पोलिसांच्या सायबर शाखेच्यावतीने वुईफाईटसीसी हा उपक्रम सुरू केला आहे. हा सायबर क्रा़ईम जनजागृती करिता राबविण्यात येणारा राज्यातील पहिलाच उपक्रम असल्याची माहिती उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी पत्रकार परिषदेत दिली.ते म्हणाले,सायबर शाखेकडे २०१६ मध्ये ५५० तक्रारी आल्या होत्या. मात्र, आॅगस्ट २०१७ मध्येच मागच्या वर्षीचा आकडा ओलांडला असून, ५७२ तक्रारी आलेल्या आहेत. यावरून सायबर क्राईम जलद गतीने वाढत असल्याचे दिसून येत आहे. युवा पिढीचा सहभाग वाढत असल्याने सायबर क्राईमबद्दल शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जनजागृती निर्माण करावी यासाठी हैद्राबाद येथील सिडॅकआणि गुगल इंडिया यांच्या वतीने खास कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे.त्यानुसार त्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून सायबर सुरक्षेसाठी पोस्टर, घोषवाक्य, वकृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. दुस-या टप्प्यामध्ये शाळा आणि महाविद्यालयांमधील शिक्षकांना सायबर क्राईमच्या विरोधात कसे काम करावे, हे गुन्हे कसे रोखावेत यासाठी खास प्रशिक्षण दिले जाणार आहे. तिस-या टप्प्यात सिडॅक आणि गुगल इंडिया, आयटी वं कंपन्यांमधील तज्ञ, मानसशास्त्रज्ञ हे शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना सायबर गुन्हेगारीबाबत सविस्तर माहिती देणार आहेत.याव्यतिरिक्त सायबर गुन्हयाबददल इंटरनेटमार्फत तज्ञ व्यक्तींचे ब्लॉग, व्हिडिओ ब्लॉग इत्यादी मार्फत जनजागृती करण्यात येणार आहे. दि. १६ आॅक्टोबर पासून या उपक्रमाची सुरूवात होत असून, जानेवारी महिन्यापर्यंत यामाध्यमातून कार्यक्रम होत जातील. पुण्यातील बहुतांश शाळा, महाविद्यालयांमध्ये याची माहिती पोहोचविण्यात आली असल्याचे हिरेमठ यांनी सांगितले. यावेळी पोलीस निरीक्षक राधिका फडके यावेळी उपस्थित होत्या.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिस