Pune | पुण्यात पाेलिसांत तक्रार दिल्याच्या रागातून पत्नीवर वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 13:30 IST2022-12-10T13:28:36+5:302022-12-10T13:30:02+5:30
धनकवडीतील गुलाबनगर साेसायटीमध्ये बुधवारी सायंकाळी हा प्रकार घडला...

Pune | पुण्यात पाेलिसांत तक्रार दिल्याच्या रागातून पत्नीवर वार
पुणे : पाेलिसांत तक्रार दिल्याच्या रागातून पतीने धारदार हत्याराने पत्नीवर वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हल्ल्यात महिला जखमी झाली आहे. याप्रकरणी सहकारनगर पाेलिसांनी आराेपी पतीस अटक केली आहे. धनकवडीतील गुलाबनगर साेसायटीमध्ये बुधवारी सायंकाळी हा प्रकार घडला.
अनिल महादेव चांदणे वय ४०, रा. गल्ली क्र. ५२, तळजाई वसाहत, पद्मावती असे अटक आराेपीचे नाव आहे. त्याच्याविराेधात ३७ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्याद दिली आहे. त्यानुसार जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सहकारनगर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महिलने त्रास देणाऱ्या पतीविराेधात पाेलिसांत तक्रार दिली हाेती. त्या रागातून आराेपीने फिर्यादींना बुधवारी सायंकाळी ७ वाजता रस्त्यावर एकटे गाठत पाठीमागून येत त्यांच्यावर धारदार हत्याराने वार केले. खांदा तसेच शरीरावर इतर ठिकाणी वार लागल्याने फिर्यादी जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी सहकारनगर पाेलिसांनी आराेपी अनिल चांदणे याला अटक केली आहे.