अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पत्नीने पतीवर केले सुरीने वार, कोंढवा भागातील घटना

By नितीश गोवंडे | Updated: July 3, 2024 15:25 IST2024-07-03T15:25:27+5:302024-07-03T15:25:54+5:30

याप्रकरणी महिलेविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला....

Wife stabs husband with knife on suspicion of having immoral relationship, incident in Kondhwa area | अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पत्नीने पतीवर केले सुरीने वार, कोंढवा भागातील घटना

अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पत्नीने पतीवर केले सुरीने वार, कोंढवा भागातील घटना

पुणे : नात्यातील एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पत्नीने पतीच्या गळ्यावर सुरीने वार केल्याची घटना कोंढवा भागात घडली. याप्रकरणी महिलेविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. योगेश विलास वाघमारे (३९, रा. चंद्रभागानगर, कोंढवा) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.

याप्रकरणी कोमल योगेश वाघमारे (३५) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश यांनी याबाबत कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. योगेश यांचे नात्यातील एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय कोमलला होता. या कारणावरून त्यांच्यात नेहमी वाद व्हायचे.

सोमवारी (दि. १) रात्री त्यांच्यात पुन्हा वाद झाला. तेव्हा कोमलने स्वयंपाकघरातील सुरीने योगेशच्या गळ्यावर वार केला. तसेच नवऱ्याच्या खांद्याचा चावा घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जाधव करत आहेत.

Web Title: Wife stabs husband with knife on suspicion of having immoral relationship, incident in Kondhwa area