शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
2
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
3
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
4
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
5
​​​​​​​Kotak Mahindra Bank Success Story: २ खोल्यांपासून झाली सुरुवात, आज ४ लाख कोटींचा टर्नओव्हर; वाचा कोटक महिंद्रा बँकेची अनटोल्ड स्टोरी
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये चीनने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली, राफेलचीही बदनामी केली; अहवालात खुलासा
7
VIDEO : तिकडं स्टार्कचा अप्रतिम फ्लाइंग कॅच; इकडं नेटकऱ्यांनी KL राहुलची उडवली खिल्ली; कारण...
8
Astro Tips: कुंडलीतील गुरुचे स्थान निश्चित करते, तुम्हाला संसार सुख मिळणार की वैराग्य!
9
भयंकर! चालत्या कारला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी लोकांनी मारल्या उड्या
10
सॅलरी कमी होणार, PF-ग्रॅच्युईटीमध्ये वाढ होणार? नोकरी करणाऱ्या लोकांसाठी अनेक गोष्टी बदलणार
11
जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये तडजोडी, आयात उमेदवार अन् फोडाफोडी; अजितदादांच्या ‘ताकदीच्या मर्यादा’ उघड
12
Video - "मी तुम्हाला आणि तुमच्या मुलीला मारून टाकेन"; प्रिन्सिपलची जीवे मारण्याची धमकी
13
‘या’ सरकारी बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या शर्यतीत दिग्गज बँक; अनेक दिवसांपासून सुरू आहे खासगीकरणाचा विचार
14
उपराष्ट्रपतीपद सोडल्यावर जगदीप धनखड पहिल्यांदाच बोलले, म्हणाले मला बोलायला...
15
Smriti Mandhana Haldi Ceremony : टीम इंडियाच्या 'राणी'च्या हळदी समारंभात संघातील साऱ्याजणींचा झिंगाट डान्स
16
ऑपरेशन सिंदूरनंतर काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हालचालींना वेग; महत्त्वाची माहिती उघड...
17
दिल्लीत पाकिस्तानातून पाठवलेला शस्त्रांचा साठा जप्त; लॉरेन्स टोळीसह कुख्यात गुंडांना हत्यार पुरवणार होते
18
हृदयस्पर्शी! मेकअपला जाताना वधूचा अपघात; नवरदेवाने रुग्णालयातच केलं लग्न, घातलं मंगळसूत्र
19
"लोकशाही पायदळी तुडवून धमकावून राज्यात निवडणुका बिनविरोध होत आहेत", काँग्रेसची टीका
20
Delhi Blast : डॉक्टर गायब, सोशल मीडिया अकाउंट डिलीट; अल-फलाह युनिव्हर्सिटीबाबत धक्कादायक खुलासे
Daily Top 2Weekly Top 5

पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड समोर का येत नाही? शिवसेना नेत्याने केलं महत्वपूर्ण विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 19:10 IST

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात वनमंत्री व शिवसेना नेते संजय राठोड यांचे नाव चर्चेत आल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे...

पुणे : पूजा चव्हाणमृत्यू प्रकरणात वनमंत्री व शिवसेना नेते संजय राठोड यांचे नाव चर्चेत आल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून सातत्याने या प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली जाते आहे. मात्र  याप्रकरणी महाविकास आघाडीतील नेते मात्र सावध प्रतिक्रिया देताना पाहायला मिळत आहे. पण आता शिवसेनेच्या नेत्यानेच पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड यांच्याबाबत महत्वपूर्ण विधान केले आहे. 

महंमदवाडी परिसरात राहणाऱ्या पूजा चव्हाण या २२ वर्षांच्या तरुणीने रविवारी( दि. ७) घराच्या बाल्कनीमधून पडुन मृत्यू झाला होता. ही घटना आत्महत्या आहे की हत्या अशी शंका घेतली जात आहे. त्यानंतर धक्कादायक बाब म्हणजे या मुलीचे काही कॉल रेकॅार्डींग पोलिसांच्या हाती लागले होते. त्यावरुन पूजा ने महाविकास आघाडीतल्या एका मंत्र्यांच्या दबावातून आत्महत्या केली असल्याचा आरोप भाजप नेते करत होते. त्याचबरोबर पोलिसही हे प्रकरण दबावामुळे गांभीर्याने घेत नसून पूजाच्या जप्त केलेल्या मोबाईल आणि लॅपटॅाप मध्ये अनेक धक्कादायक बाबी असल्याचेही भाजप नेत्यांचे म्हणणे होते. 

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी भाष्य केले आहे. ते गुरुवारी पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ते बोलत होते. सामंत म्हणाले,पूजा चव्हाण प्रकरणी राठोड समोर का येत नाहीत हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न. पण याबाबत तपास सुरु आहे. अहवाल सादर केलेला आहे अशीही माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बोलले आहेत. त्यामुळे मी आणखी काही बोलणं योग्य नाही. असे म्हणत पूजा चव्हाण प्रकरणावर जास्त भाष्य करणे टाळले आहे. 

विरोधकांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे... राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर भाजपने आम्ही सर्वाधिक जागा जिंकू असा दावा केला होता. तसेच राज्यातील ग्रामपंचायतीवर भाजपचेच सर्वाधिक सरपंच व उपसरपंच बसलेले पाहायला मिळतील असे जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात महाविकास आघाडीचेच ग्रामपंचायत व सरपंच निवडीवर वर्चस्व राहिल्याचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विरोधी पक्ष असलेल्या भाजप व त्यांच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे, असे मत देखील सामंत यांनी यावेळी व्यक्त केले. 

 

टॅग्स :PuneपुणेSanjay Rathodसंजय राठोडPooja Chavanपूजा चव्हाणDeathमृत्यूUday Samantउदय सामंतPoliticsराजकारणShiv Senaशिवसेना