Pune | मीटर जाेरात का पळत आहे? असे बाेलत रिक्षा चालकास मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 18:04 IST2022-12-02T18:01:57+5:302022-12-02T18:04:02+5:30

रिक्षा चालवत असताना पाठीमागून हाताने मारहाण करीत त्यांच्या डाव्या कानाजवळ तसेच डाेक्यात चार-पाच बुक्क्या मारल्या...

Why is the meter running? The rickshaw driver was beaten while doing so pune crime news | Pune | मीटर जाेरात का पळत आहे? असे बाेलत रिक्षा चालकास मारहाण

Pune | मीटर जाेरात का पळत आहे? असे बाेलत रिक्षा चालकास मारहाण

पुणे : रिक्षाचे मीटर जाेरात का पळत आहे? असे बाेलून वाद घालत एका प्रवाशाने ज्येष्ठ रिक्षाचालकास बेदम मारहाण केली. त्यामध्ये रिक्षाचालकाच्या डाेक्यात गंभीर इजा झाली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

प्रसाद छगनराव पालकर (वय ५९, रा. विवेकानंद पार्क, नेहरू मेमाेरिअल हाॅल, कॅम्प, पुणे) असे जखमी झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आराेपी युवकाविराेधात येरवडा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आराेपी युवक आणि त्याच्या दाेन मित्रांना फिर्यादी पालकर रिक्षातून कल्याणीनगरहून भाेसलेनगर येथे घेऊन जात हाेते. यावेळी आराेपीने फिर्यादींना दुसऱ्या रस्त्याने भाेसलेनगरला रिक्षा घेऊन चल असे सांगत रिक्षाचे मीटर जाेरात का पळत आहे, अशी विचारणा करीत वाद घातला. तसेच पालकर हे रिक्षा चालवत असताना पाठीमागून हाताने मारहाण करीत त्यांच्या डाव्या कानाजवळ तसेच डाेक्यात चार-पाच बुक्क्या मारल्या. त्यामुळे डाव्या कानामागील नस फाटून डाेक्यात रक्तस्त्राव झाला आणि त्यामुळे त्यांना बाेलण्यास अडचण येत असल्याचेही तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे. तक्रार अर्जाची चाैकशी करून पाेलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पाेलिस उपनिरीक्षक शेलार हे करीत आहेत.

Web Title: Why is the meter running? The rickshaw driver was beaten while doing so pune crime news