अजित पवारांविरोधात पुरावे द्या स्वतः तक्रार करेन! ' त्या' प्रकरणावरून सुळेंचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 13:39 IST2021-06-28T13:38:10+5:302021-06-28T13:39:44+5:30

आंदोलनात आलेल्या सुळेंचा विरोधात नागरिकांची घोषणाबाजी. आंबिल ओढ्यातील आंदोलक महिलांना घेऊन सुळे थेट आयुक्तांचा भेटीला

Why did Supriya Sule say that she will throw evidence against Ajit Pawar herself? | अजित पवारांविरोधात पुरावे द्या स्वतः तक्रार करेन! ' त्या' प्रकरणावरून सुळेंचं वक्तव्य

अजित पवारांविरोधात पुरावे द्या स्वतः तक्रार करेन! ' त्या' प्रकरणावरून सुळेंचं वक्तव्य

अजित पवारांचा विरोधात पुरावे द्या खरं असेल तर मी स्वतः तक्रार करेन असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी आंबिल ओढा प्रकरणात आक्रमक पवित्रा घेतला आहे. पुण्यात आज महापालिकेसमोर आंबिल ओढ्यातल्या रहिवासी नागरिकांनी आंदोलन केलं. या आंदोलकांना भेटायला सुप्रिया सुळे गेल्या. त्यावेळी आक्रमक होत आंदोलन करणाऱ्या नागरिकांना सुळे यांनी थेट उत्तर दिले.

आज पुणे महापालिकेसमोर दोन आंदोलन झाली. एकीकडे कचरावेचक आंदोलन करत असतानाच दुसऱ्या बाजूला आंबिल ओढयातील नागरिकांनी देखील इथेच आंदोलन सुरू केलं.त्यावेळी कचरावेचकांची भेट घेऊन सुळे आंबिल ओढ्यातील नागरिकांचा भेटीला गेल्या.

यावेळी आक्रमक झालेल्या नागरिकांनी सुळे यांचा समोरच अजित पवारांविरोधात घोषणाबाजी केली. आमची घरं अजित पवारांनी पाडली तुम्ही इथे का आलात असा सवाल आंदोलकांनी विचारला.या महिलांना उत्तर देताना सुळे यांनी थेट पुरावे मागितले.अजित पवारांविरोधात पुरावे दिले तर मीच तक्रार करेन असं सुळे म्हणाल्या.

एकीकडे या प्रकरणात अजित पवारांवर आरोप होत असताना सुळे याच प्रकरणी आयुक्तांना भेटायला गेल्या आहेत.सुळे आंदोलक महीलांसहित आयुक्तांची भेट घेत आहेत त्यामुळे या प्रकरणी नक्की काय राजकारण शिजतंय असा प्रश्न विचारला जातो आहे.

Web Title: Why did Supriya Sule say that she will throw evidence against Ajit Pawar herself?