NCP City President : राष्ट्रवादी काँग्रेसचा शहराध्यक्ष काेण ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 08:58 IST2025-05-16T08:57:27+5:302025-05-16T08:58:01+5:30

दीपक मानकर यांच्या विरोधात समर्थ पोलिस चौकीमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Who is the city president of the Nationalist Congress Party? | NCP City President : राष्ट्रवादी काँग्रेसचा शहराध्यक्ष काेण ?

NCP City President : राष्ट्रवादी काँग्रेसचा शहराध्यक्ष काेण ?

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा शहराध्यक्ष कोण असणार ? यावर चर्चा सुरू आहे.माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी व्यवहारासंदर्भात पोलिसांना सादर केलेली कागदपत्र बनवाट असल्याचे समोर आले. त्यानंतर दीपक मानकर यांच्या विरोधात समर्थ पोलिस चौकीमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मानकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी "माझा वाढता राजकीय आलेख पाहता, काही समाजकंटकांकडून माझी राजकीय बदनामी केली जात असल्याचा आरोप करत शहराध्यक्षपदाचा राजीनामा अजित पवारांकडे दिला. मात्र, काही पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांना मानकर यांचा राजीनामा स्वीकारू नका, अशी देखील मागणी केली आहे.

महापालिका निवडणुका अवघ्या चार महिन्यांवरती आल्या आहेत त्यामुळे महापालिकेची चांगली जाण असणाऱ्या नेत्याची शहराध्यक्षपदी वर्णी लागणार आहे. आमदार चेतन तुपे, माजी आमदार सुनील टिंगरे , पक्षाचे कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, माजी महापौर दत्ता धनकवडे आणि माजी सभागृह नेते सुभाष जगताप यांच्या नावाचीदेखील चर्चा सुरू आहे.

Web Title: Who is the city president of the Nationalist Congress Party?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.