'कोण म्हणतंय जाणार नाही..., साहेब असल्यावर कशाला हवे निमंत्रण मी जाणारच', वसंत मोरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 15:53 IST2022-04-15T15:50:03+5:302022-04-15T15:53:58+5:30
पुण्यातील खालकर चौक मारुती मंदिरच्या कार्यक्रमाला राज ठाकरे हनुमान जयंतीला (शनिवार) पुण्यात उपस्थित राहणार आहेत

'कोण म्हणतंय जाणार नाही..., साहेब असल्यावर कशाला हवे निमंत्रण मी जाणारच', वसंत मोरे
पुणे : पुण्यातील खालकर चौक मारुती मंदिरच्या कार्यक्रमाला राज ठाकरे हनुमान जयंतीला (शनिवार) पुण्यात उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते सायंकाळी ६ वाजता मारुतीची महाआरती आयोजित करण्यात आली आहे. त्याचवेळी हनुमान चालिसा पठणही होणार आहे. मनसेचे माजी शहराध्यक्ष अजय शिंदे यांच्यावतीने हिंदू प्रतिष्ठान खालकर चौक मित्र मंडळ यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. रविवारी सायंकाळी ७ ते रात्री ११ यावेळात महाप्रसाद होणार असल्याचे मंडळाच्या वतीने कळवण्यात आले आहे.
उद्याच्या कार्यक्रमाला अजय शिंदे यांनी वसंत मोरेंना निमंत्रण दिल्या नसल्याच्या अफवा पसरू लागल्या आहेत. त्यावर लोकमतने वसंत मोरेंशी संवाद साधला. त्यांनी यावर वसंत मोरे खुलासा केला आहे.
''राज ठाकरे स्वतः जिथं आहेत. तिथं मला निमंत्रणाची गरज नाही. निमंत्रण आहे का नाही मी सांगणार नाही मी तिथं स्वतः जाणार आणि त्यांच्यासोबत आरती करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. तसेच राज ठाकरेंना भेटणार असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत.''
पत्रिकांवर राज ठाकरे यांची भगव्या शालीत लपेटलेली प्रतिमा
पुणे शहरात शनिवारी मनसेकडून होणाऱ्या कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची हिंदू जननायक अशी प्रतिमा निर्माण कऱण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी छापलेल्या पत्रिकांवर राज ठाकरे यांची भगव्या शालीत लपेटलेली प्रतिमा प्रसिद्ध करण्यात आली आहे.
राज ठाकरेंनी दिलाय राज्य सरकारला इशारा
पुढील महिन्यात ३ मेला देशभरता ईद साजरी केली जाणार आहे. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. भोंगे खाली न उतरवल्यास मशिदींसमोर लाऊड स्पीकरवर हनुमान चालिसा लावण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.