फिंगर प्रिंट घेताना, आला अंगचटीला! पोस्ट ऑफिसात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 12:22 IST2023-09-18T12:22:26+5:302023-09-18T12:22:46+5:30

याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी प्रणव कुमार चक्रवर्ती (वय ५५, रा. एकतानगर, लोहगाव) याला अटक केली आहे...

While taking finger print, Ala Angachatila! Minor girl molested in post office | फिंगर प्रिंट घेताना, आला अंगचटीला! पोस्ट ऑफिसात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

फिंगर प्रिंट घेताना, आला अंगचटीला! पोस्ट ऑफिसात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

पुणे : आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीचे फिंगर प्रिंट घेण्याच्या नावाखाली तिच्याशी लगट करून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी प्रणव कुमार चक्रवर्ती (वय ५५, रा. एकतानगर, लोहगाव) याला अटक केली आहे.

याबाबत लोहगावमधील १७ वर्षांच्या मुलीने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार लोहगावातील एअरपोर्ट पोस्ट ऑफिसमध्ये शनिवारी सकाळी ११ वाजता घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पोस्ट ऑफिसात गेल्या होत्या. त्यावेळी आरोपी चक्रवर्ती याने फिर्यादीची फिंगर प्रिंट घेताना शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी चक्रवर्ती याला अटक केली असून पोलिस उपनिरीक्षक चौधरी तपास करीत आहेत.

Web Title: While taking finger print, Ala Angachatila! Minor girl molested in post office