अभ्यास करताना युवतीने अचानकच उचललं टोकाचं पाऊल अन् संपवलं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 14:23 IST2023-05-18T14:23:14+5:302023-05-18T14:23:35+5:30
करंदीत १९ वर्षीय महाविद्यालयीन युवतीची गळफास घेऊन आत्महत्या

अभ्यास करताना युवतीने अचानकच उचललं टोकाचं पाऊल अन् संपवलं जीवन
केंदूर : करंदी ता. शिरूर येथील महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या एकोणीस वर्षीय युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रणिता रामदास ढोकले असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. याबाबत संतोष तात्याबा ढोकले (वय ४४ वर्षे रा. करंदी माळवस्ती ता. शिरूर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली आहे.
करंदी ता. शिरूर येथील वाघोलीतील रायसोनी कॉलेज या महाविद्यालयात शिक्षण घेणारी प्रणिता ढोकले ही रात्रीच्या सुमारास घरातील बेडरूम मध्ये अभ्यास करत होती. काही वेळाने तिने दरवाजा लावून घेतला त्यांनतर प्रणिताचा भाऊ घरी आला त्याने दरवाजा वाजवला मात्र प्रणिताने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे घरातील लोकांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश करुन पाहिले असता प्रणिता हिने घरातील छताच्या फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. दरम्यान प्रणिता हिला शिक्रापूर येथील खाजगी रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी युवतीचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आजिनाथ शिंदे हे करत आहे.