शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पुणे हवामान विभाग कधी कात टाकणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 19:37 IST

दक्षिण पुण्यात लागोपाठ तीन दिवस झालेल्या धुवांधार पावसाने महापूर येऊन हजारो लोकांचे नुकसान झाले़.....

ठळक मुद्देअत्याधुनिक साधनांचा वापर करुन लोकांना कधी देणार माहिती

पुणे:दक्षिण पुण्यात लागोपाठ तीन दिवस झालेल्या धुवांधार पावसाने महापूर येऊन हजारो लोकांचे नुकसान झाले़. २५ हून अधिक जणांचा बळी गेला़. हजार कोटी रुपयांहून अधिक मालमत्तेचे नुकसान सुमारे दोन तास झालेल्या पावसाने केले़. त्यावेळी शहरातील आत्पकालीन व्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती़. मात्र, त्याचबरोबर इतका मोठा पाऊस होईल, आपण काळजी घेतली पाहिजे, अशी कोणतीही सुचना ना हवामान खात्याने दिली, ना महापालिकेच्या आत्पकालीन विभागाने नागरिकांना सांगितली़. पुणेहवामान विभागातील अधिकाऱ्यांनी आम्ही गेले तीन दिवस पुण्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज वेबसाईटवर दिला होता, इतकेच सांगून मोकळे झाले आहेत़. भारतीय हवामान विभाग हा सार्क देशांसाठी नेडल एजन्सी म्हणून हवामानाची माहिती देण्याचे काम करतो़. जर देशातील लोकांनाच वेळच्या वेळी अतिवृष्टीचा अलर्ट हवामान विभाग देऊ शकत नाही. तर, इतर देशांना ते किती नेमकी माहिती देत असेल, याविषयी शंका घेण्यास वाव आहे़. आज माहितीच्या क्षेत्रात संपर्काची अनेक साधने उपलब्ध झाली आहेत़ फेसबुक, ट्विटरद्वारे एकाच वेळी हजारो, लाखो लोकांपर्यंत पोहचता येते़. पुणे हवामान विभागाला मात्र, याचे वावडे असल्याचे दिसून येत आहे़. दिवसभरात एका अंदाज तोही वेबसाईटवर टाकला की आपले काम संपले़. लोकांनी ते पाहून त्यातून जो काही अर्थ काढता येईल, तो काढावा, अशी मानसिकता आता उपयोगाची नाही़. तुम्ही लोकांना उत्तरदायी असले पाहिजे़. पुणे शहरात सलग तीन दिवस रात्री मुसळधार पाऊस पडत होता़. या काळात पुण्यासाठी पुणे हवामान विभागाने २४ तासात एकदा दिलेला अंदाज पाहिल्यास काय दिसते, हे पाहिले तर, असे दिसते की, २३ सप्टेंबर रोजी ‘हलक्या पावसाची शक्यता.’ २४ सप्टेंबर रोजी ‘ढंगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता़’ २५ सप्टेंबर रोजी ‘मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता़’ अशा संपूर्णपणे अतिशय मोघम स्वरुपाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता़. या अंदाजानुसार पाऊस पडेल का, किती पडेल, कोणत्या भागात पडू शकेल, कधी पडण्याची शक्यता आहे, असा कोणताही नेमकेपणा त्यात दिसून येत आहे़. हे म्हणजे वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली अशा वृत्तीतून दिलेला अंदाज आहे़. हवामान विभागातील अधिकारी सांगतात की, हवामानात सातत्याने बदल होत असतात़. त्यांच्याकडे  डॉप्लर रडारपासून अनेक सोयी सुविधा असताना त्यात दर काही मिनिटांनी बदलत्या हवामानाची माहिती येत असते़. त्यांनी जर ठरले तर दर तासाला विशेषत: महत्वाच्या दिवशी ते संपर्कांची वेगवेगळ्या साधनांचा वापर करुन ते लोकांपर्यंत पोहचवू शकतात़. मुंबई हवामान विभागाकडून दर तीन तासाचा अलर्ट दिला जातो़ पुणे हवामान विभाग हे कधी करणार?......पुण्यात ६० मिमी पाऊस पडला तरी तो येथील भौगोलिक रचनेमुळे धोकादायक ठरु शकतो, असे हवामान विभागाचे अधिकारी सांगतात़. मग, पुण्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज असताना त्यादृष्टीने पुणेकरांना अलर्ट करुन त्याचे महत्व जाणून देण्याचे काम त्यांचेही आहे़. हवामान विभागाने आपल्यावरील लोकांचा विश्वास वाढविण्याचे काम दुसरे कोणी येऊन करणार नाही़ त्यांनाच हे काम करावे लागणार आहेत़.

टॅग्स :PuneपुणेweatherहवामानRainपाऊस