शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

धक्कादायक ! पुण्यात अग्निशमन दलात तब्बल ५६ टक्के मनुष्यबळाची कमतरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 2:13 PM

दलात भरतीसाठी ची नियमावली मंजूरीसाठी नगरविकास विभागाकडे ३ वर्षा़पासून प्रलंबित

ठळक मुद्देपुण्यातील सर्वपक्षीय आमदारांनी यासाठी तातडीने करावा पाठपुरावा

फॅशन स्ट्रीटला काल रात्री लागलेल्या भीषण आगीत अनेक दुकाने जाळून खाक झाली. या आगीत झालेल्या कोट्यावधी रूपयांच्या नुकसानीला राज्याचे नगरविकास खाते जबाबदार असल्याचा आरोप सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर यांनी केला आहे. तर पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलात ५५ % जागा रिक्त असून त्या कधी भरणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. 

पुण्यात आगी लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.  दोन महिन्यांपूर्वी सीरम इन्स्टिट्यूट मध्ये आग लागली होती तर आज फॅशन स्ट्रीट वर भीषण आग लागून कोट्यावधी रुपयांची हानी झाली आहे. अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे,  फायर सेफ्टी ऑडीट करणे  व आगीच्या घटना घडल्या तरी कमीतकमी हानी व्हावी. यासाठी महापालिकेच्या अग्निशमन दलात सुयोग्य व पुरेसे कर्मचारी असणे आवश्यक आहे. अग्नीशमन दलातील अधिकारी व कर्मचारी यांची भरती करण्यासाठी आदर्श सामाईक सेवा प्रवेश नियमावली राज्यातील अग्नीशमन सेवा संचालनालयाने मार्च २०१८ मध्ये तयार करून नगरविकास मंत्रालयाकडे मंजुरीसाठी सादर केली होती. याला तीन वर्षे झाली तरी अजून नगरविकास खाते त्यावर बसून आहे.. याचा परिणाम म्हणजे पुणे महापालिकेच्या अग्नीशमन दलातील भरती रखडली आहे. आजमितीला पुणे महापालिकेच्या अग्नीशमन दलातील मंजूर ९१०  पदांपैकी ५१० पदे रिक्त आहेत. पुणे शहराचा विस्तार आणि शहराची सुरक्षितता विचारात घेता या सेवेतील पदे दीर्घकाळ रिक्त ठेवणे अडचणीचे असल्याचे पुणे महापालिकेच्या आयुक्तांनी सातत्याने नगरविकास मंत्रालयाच्या प्रधान सचिवांना कळवूनही मंत्रालयाकडून निर्णय घेतला जात नाही हे दुर्दैव आहे. पुण्यातील सर्वपक्षीय आमदारांनी यासाठी तातडीने पाठपुरावा करणे गरजेचे आहे तरच भविष्यात अशा घटनांना आळा बसेल. असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.   

टॅग्स :PuneपुणेfashionफॅशनFairजत्राPoliceपोलिस