शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

Police Bharti 2024: मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षेला मुहूर्त कधी मिळणार? शासनाला विद्यार्थ्यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 15:41 IST

मुंबई पोलीस शिपाई, चालक, बॅण्डसमन व मुंबई कारागृह पोलीस यांची लेखी परीक्षा अद्यापही न झाल्यामुळे उमेदवार लेखी परीक्षेच्या प्रतिक्षेत

बारामती : संपूर्ण महाराष्ट्रात १७ हजार ४७१ पदांची पोलीस भरती प्रक्रिया जवळजवळ संपत आलेली आहे. अनेक उमेदवार निवड होऊन प्रशिक्षणही घेत आहेत. तर काही उमेदवारांचे प्रशिक्षण कालावधी वेतनही सुरू झालेले आहे. परंतु मुंबई पोलीस शिपाई, चालक, बॅण्डसमन व मुंबई कारागृह पोलीस यांची लेखी परीक्षा अद्यापही न झाल्यामुळे उमेदवार लेखी परीक्षेच्या प्रतिक्षेत आहेत.       

मुंबईबरोबरच पुणे कारागृह पोलीसाची मैदानी चाचणी व लेखी परीक्षा ही अद्यापर्यंत बाकी आहे. याबाबत अधिक माहिती देताना बारामती येथील सह्याद्री करिअर अकॅडमीचे संचालक उमेश रुपनवर म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्राची पोलीस भरती प्रक्रिया पार पडली असून मुंबईमध्ये २ हजार ५७२ एवढ्या मोठ्या जागांची भरती प्रक्रिया रखडलेली असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. मुंबईला संपूर्ण महाराष्ट्राच्या जवळपास ३० टक्के उमेदवार फॉर्म भरतात. म्हणजेच विद्यार्थ्यांची संख्या काही हजारांमध्ये असते. तरी गृह विभागाने व पोलीस खात्याने लवकरात लवकर लेखी परीक्षेची तारीख जाहीर करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा.     संपूर्ण महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबविली जात असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सुरुवातीपासूनच उत्साहाचे वातावरण होते. परंतु काही जिल्ह्यांची रखडलेल्या भरती प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. पोलीस भरती प्रकिया कालावधीमध्येच विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे व आचारसंहिता असल्यामुळे ही भरती प्रक्रिया काही कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आली. परंतु २५ नोव्हेंबर २०२४ रोजी आचारसंहिता संपल्यानंतरही अजूनही मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजी पसरत चालली आहे. त्यातच शासनाने लवकरच नवीन पोलीस भरती प्रकिया ही जाहीर केली जाईल, असे घोषित केल्यामुळे उमेदवारांना पुढे होणाऱ्या भरती प्रकियेचे वेध लागले आहेत. परंतु जोपर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण होत नाही. तोपर्यंत नवीन भरती प्रक्रिया संदर्भातील आदेश येऊ शकत नाही. याची उमेदवारांना जाणीव आहे. तरी पोलीस खात्याने व गृह विभागाने या गंभीर बाबीकडे विशेष लक्ष देऊन लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया पूर्ण करावी, अशी विद्यार्थ्यांमधून मागणी होत आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसStudentविद्यार्थीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारexamपरीक्षाEducationशिक्षण