शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाचे रुंदीकरण होणार कधी?

By admin | Updated: June 23, 2016 02:14 IST

इंदापूर शहरातील वाहतूककोंडी टाळण्यासाठी पुणे-सोलापूर महामार्गाचे चौपदरीकरण करताना बाह्यवळण रस्ता करण्यात आला.

महेंद्र कांबळे,  इंदापूरइंदापूर शहरातील वाहतूककोंडी टाळण्यासाठी पुणे-सोलापूर महामार्गाचे चौपदरीकरण करताना बाह्यवळण रस्ता करण्यात आला. शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे रुंदीकरण कागदावरच ठेवले आहे. त्यामुळे अतिक्रमण वाढले. शहरातून गेलेल्या या जुन्या मार्गावरून जाणाऱ्या पादचारी, विद्यार्थी, नागरिकांना वाहनांच्या गर्दीतून वाट काढताना जीव मुठीत धरून चालावे लागते. पुणे-सोलापूर महामार्गाचे चौपदरीकरण करताना अकलूज चौकापासून बाह्यवळण रस्ता करण्यात आला. शहराच्या बाहेरून रस्ता काढण्यात आला. त्याचवेळी शहरातून जाणाऱ्या जुन्या महामार्गाचेदेखील रुंदीकरण करण्याचे नियोजन होते; परंतु त्यामध्येदेखील राजकारण आले आहे. आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेची निवडणूक आहे. या निवडणुकीच्या काळात रस्त्याच्या लगत असलेले व्यावसायिक बाधित होतील. त्याचा परिणाम निवडणुकीत होईल. त्यामुळे रुंदीकरण थांबले आहे. परिणामी शहरातील या मुख्य रस्त्यावरून जाताना विद्यार्थी-नागरिकांना जीव मुठीत धरूनच जावे लागते. अवजड वाहनांसह चारचाकी गाड्यांची गर्दी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असते. त्याचबरोबर शहरातील बाबा चौकातील मोकळ्या भूखंडालगत महामार्गाला लागूनच प्रवासी, तसेच मालवाहतूक गाड्यांचा ताफा लागलेला असतो. त्यामुळेदेखील वाहतुकीच्या कोंडीत भर पडते. या जुन्या महामार्गाला मोकळा श्वास घेण्यासाठी रुंदीकरण गरजेचे आहे. ‘हॉकर्स झोन’अंतर्गत जागा द्यावीमहामार्गाचे रुंदीकरण करताना पथारी व्यावसायिकांचा व्यवसाय धोक्यात येऊ नये, यासाठी देखील नगरपालिकेने तरतूद करण्याची गरज आहे. राज्य शासनाने नगरपालिकांना ‘हॉकर्स झोन’ करण्याचे आदेश दिले आहेत. महामार्ग असल्यामुळे इंदापुरातून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. आंतरराज्य वाहतुकीमुळे वाहनांची गर्दी असते. तसेच, पथारी व्यावसायिकांनादेखील रस्त्यालगतच व्यवसाय सोयीस्कर ठरतो. त्यांना बाधित न करता महामार्गाच्या रुंदीकरणानंतर रस्त्यालगतच ‘हॉकर्स झोन’अंतर्गत जागा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, असे पथारी व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. राहुल मखरे यांनी सांगितले. मार्ग काढताना कसरत जुना महामार्ग अकलूज चौक ते वाघ पेट्रोलपंपापर्यंत रुंद केला आहे. पुढे शहरातून जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याची गरज असताना वाघ पेट्रोलपंप टेंभुर्णी नाका ते सरडेवाडीपर्यंतच्या जुन्या महामार्गाचे रुंदीकरण थांबले आहे. त्याला निधी नसल्याचेदेखील सांगण्यात येते. मात्र, न्यायालय, एसटी बसस्थानक, काँग्रेस भवन, पंचायत समिती, इंदापूर महाविद्यालय, श्री नारायण रामदास हायस्कूल, इंदापूर नगरपालिका आदी महत्त्वाची कार्यालये जुन्या महामार्गालगतच आहेत. त्यामुळे नागरिक, विद्यार्थी, प्रवाशांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. अवजड गाड्यांसह चारचाकी गाड्यांची रेलचेल या मार्गावरच असते. त्यातून मार्ग काढताना सर्वांनाच कसरत करावी लागते.