शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पुणे तुंबल्यावर महापालिका खडबडून जागी; तक्रारीच्या फोनची वाट पाहू नका, स्वत:हून कामे करा! आयुक्तांच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 10:43 IST

नेहमीच पाणी साठणारा भाग, नागरी वस्तीत पाणी शिरण्याची ठिकाणे याबाबत विशेष काळजी घ्यावी, तेथे आवश्यक त्या उपाययाेजना कराव्यात

पुणे: शहरात जोरदार पावसानंतर महापालिका प्रशासन सर्वच स्तरावरून टीकेचे धनी ठरले. विविध पक्ष, स्वयंसेवी संस्था आदींनी महापालिकेवर टीकेची झोड उठवल्यावर महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन, आता तक्रारींचे फोन येण्याची वाट पाहू नका, स्वत:हून कामे करा, अशा सूचना पालिका आयुक्तांनी दिल्या आहेत.

महापालिकेच्या ढिसाळ यंत्रणेवर सर्वच स्तरावरून नाराजी व्यक्त होत असताना ढिम्म प्रशासनाला हलविण्यासाठी महापालिका आयुक्तांनी घेतलेल्या बैठकीत सर्व खातेप्रमुख, उपायुक्त, क्षेत्रीय अधिकारी यांना बोलवून आपत्तीदरम्यान सुट्टीच्या दिवशीही मनुष्यबळ सतर्क ठेवावे, असे सांगितले. सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या भागातील नालेसफाई कितपत झाली आहे याचा आढावा घ्यावा. संबंधित ठेकेदाराकडून उर्वरित कामे प्राधान्याने करून घ्यावेत, असे सांगितले.

डॉ. भोसले म्हणाले...

- मेट्रो, ‘पीएमआरडीए’कडून सुरू असलेल्या कामांच्या ठिकाणी रस्ते दुरुस्ती महापालिकेच्या स्तरावर करावी. हा खर्च नंतर आपण संबंधित संस्थांकडून घेऊ.- महापालिकेच्या मुख्य खात्यांनी क्षेत्रीय कार्यालयांशी समन्वय साधून पावसाळी कामे तातडीने पूर्ण करून घ्यावीत.- पावसाळा संपेपर्यंत सर्व कामे करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदाराचीच राहील, अशा सूचना त्यांना द्याव्यात.- झाडे पडण्याच्या घटना कमी करण्यासाठी फांद्या छाटणीसंदर्भात कार्यवाही करावी.- क्षेत्रीय कार्यालयांनी त्यांच्याकडील उपलब्ध मशीनरी, साधन सामग्री याची माहिती घेऊन ते उपलब्ध करून द्यावे. वेळ पडली तर नव्याने खरेदी करावी.- नेहमीच पाणी साठणारा भाग, नागरी वस्तीत पाणी शिरण्याची ठिकाणे याबाबत विशेष काळजी घ्यावी, तेथे आवश्यक त्या उपाययाेजना कराव्यात.

क्षेत्रीय अधिकारी नोडल ऑफिसर

महापालिकेच्या पंधरा क्षेत्रीय कार्यालयांच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी या पावसाळ्यात नोडल ऑफिसर म्हणून काम करावे. त्यांनी सहायक आयुक्तांच्या संपर्कात राहून आवश्यक ती साधनसामग्री, मशीनरी, उपलब्ध करून नागरिकांच्या सेवेत कायम राहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाRainपाऊसcommissionerआयुक्तenvironmentपर्यावरणHealthआरोग्यHomeसुंदर गृहनियोजन