पुण्यातील भाजप कार्यालयात जेव्हा पहिल्याच पत्रकार परिषदेला मस्तानी येते

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 18:12 IST2019-04-03T18:10:48+5:302019-04-03T18:12:42+5:30

भाजपाच्या सन्मान हाॅटेल येथील शहर कार्यालयामध्ये पत्रकार परिषद आयाेजित करण्यात आली हाेती. या पत्रकार परिषदेत निवडणूक प्रचाराची माहिती देण्यात आली.

when mastani comes to bjp's first press conference | पुण्यातील भाजप कार्यालयात जेव्हा पहिल्याच पत्रकार परिषदेला मस्तानी येते

पुण्यातील भाजप कार्यालयात जेव्हा पहिल्याच पत्रकार परिषदेला मस्तानी येते

पुणे : भारतीय जनता पार्टीकडून गिरीश बापट यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काल त्यांनी मिरवणूक काढत आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केला. आज शहर भाजप तर्फे प्रचाराची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयाेजन करण्यात आले हाेते. परिषद संपल्यानंतर भाजपाचे शहराध्यक्ष याेगेश गाेगावले यांनी सर्वांसाठी मस्तानी आणली असून सर्वांनी ती घ्यावी अशी विनंती केली. त्यावर मस्तानी आईस्क्रिम म्हणा अशी काेपरखळी गिरीश बापट यांनी गाेगावले यांना मारली आणि एकच हशा पिकला. 

भाजपाच्या सन्मान हाॅटेल येथील शहर कार्यालयामध्ये पत्रकार परिषद आयाेजित करण्यात आली हाेती. या पत्रकार परिषदेत निवडणूक प्रचाराची माहिती देण्यात आली. त्याचबराेबर भाजपाच्या प्रचाराच्या डिस्प्ले व्हॅनचे उद्घाटन देखील करण्यात आले. पत्रकार परिषदेनंतर पुण्यातील सुप्रसिद्ध सुजाता मस्तानी आईस्क्रिम सर्वांसाठी मागविण्यात आली हाेती. ही आईस्क्रिम पुण्यात प्रसिद्ध असून तिला मस्तानी याच नावाने ओळखले जाते. त्यामुळे गाेगावले यांनी सर्वांसाठी मस्तानी मागवली असून ती सर्वांनी घ्यावी असा आग्रह केला. त्यावेळी मस्तानी आईस्क्रिम म्हणा, गैरसमज नकाे अशी मिश्किल टिप्पणी गिरीश बापट यांनी केली. 

बापट यांच्या या आधीच्या काही वक्तव्यांमुळे त्यांच्यावर टीका झालेली असल्याने बापट आता खबरदारी घेत असल्याचे यावेळी दिसून आले. 

Web Title: when mastani comes to bjp's first press conference