"मला हि गोळी बदलून मिळेल" अशी विचारणा केली असता डोक्यात घातला लाकडी दांडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 16:11 IST2021-03-24T16:09:59+5:302021-03-24T16:11:05+5:30

औषध विक्रेत्या दुकानदाराने दिली जीवे मारण्याची धमकी

When I asked, "Will I get this pill replaced?", He put a wooden stick in his head | "मला हि गोळी बदलून मिळेल" अशी विचारणा केली असता डोक्यात घातला लाकडी दांडका

"मला हि गोळी बदलून मिळेल" अशी विचारणा केली असता डोक्यात घातला लाकडी दांडका

ठळक मुद्देसाध्या गोळीच्या कारणावरून केली मारहाण

पिंपरी : एक नागरिकाला मेडिकल दुकानदाराने मागितलेल्या गोळी ऐवजी दुसऱ्याच नावाची गोळी दिली. म्हणून दुकानदाराला त्याचा जाब विचारला असता लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. देहू -आळंदी रोड, मोशी येथे सोमवारी (दि. २२) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला.

मधुकर प्रल्हाद कुडुक (वय ३९, रा. चिखली) यांनी या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निलेश रामदास बोरुडे (रा. मोशी), असे आरोपीचे नाव आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांच्या मालकीचे देहू -आळंदी रोड येथे मिलीग्राम केमिस्ट अँड ड्रगिस्ट स्वराज कॅपिटल या नावाचे औषध विक्रीचे दुकान आहे. मेडिकल चा मालक निलेश बोरुडे याने वो-२ नावाच्या गोळी ऐवजी वो-झेड नावाची गोळी दिली. त्यामुळे त्याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी गेले. त्यावेळी आरोपीने फिर्यादी शिवा घालून शिवीगाळ केली. धक्काबुक्की करून जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच लाकडी दांडक्याने डोक्यात जोरात मारून फिर्यादीला जखमी केले.

Web Title: When I asked, "Will I get this pill replaced?", He put a wooden stick in his head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.