काटेवाडी: महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांची निवड होताच त्याच्या काटेवाडी गावात अक्षरश: दिवाळी साजरी करत जल्लोष करण्यात आला. फटाक्याची आताषबाजी व जयघोषाच्या घोषणांनी काटेवाडी दुमदुमन गेली. महिलावर्गांनी गावात आबाळ वृध्दांसमवेत साखर, पेढे वाटून आनंद व्यक्त केला. उपमुख्यमंत्रीपदाची पवार यांनी शपथ घेताच गावातील तरुणाई संत तुकाराम महाराज पालखी औटा येथे मोठया सख्येने एकत्र आली . उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयघोषाने परिसर दुमदुमला. गुलालाची उधळण , फटाक्याची आताषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला . परिसरात अक्षरश: दिवाळी साजरी करण्यात आली.
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांची निवड होताच काटेवाडीत आनंदाला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 21:06 IST
गुलालाची उधळण , फटाक्याची आताषबाजी करत आनंदोत्सव साजरा
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांची निवड होताच काटेवाडीत आनंदाला उधाण
ठळक मुद्देयावेळी अजित दादा तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है अशा घोषणासाखर, पेढे वाटून आनंद व्यक्त