कितीही यात्रा काढा ; पण लोकांच्या अडचणी समजल्या पाहिजेत: दीपाली सय्यद
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 16:44 IST2019-08-26T16:41:34+5:302019-08-26T16:44:16+5:30
यात्रेत जनतेच्या अडचणी समजून त्यानंतर यात्रा संपल्यावर असं एखादं पाऊल उचला की यात्रा सफल होईल...

कितीही यात्रा काढा ; पण लोकांच्या अडचणी समजल्या पाहिजेत: दीपाली सय्यद
पुणे : कितीही यात्रा काढा ; मात्र लोकांच्या अडचणी समजल्या पाहिजेत असा टोला शिवसंग्राम पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी लगावला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्वत:ची राजकीय मते मांडली. सध्या सगळ्या पक्षांनी निवडणुकीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन काढलेल्या यात्रांच्या संदर्भात त्यांनी आपले मत मांडले. त्या म्हणाल्या की, कितीही यात्रा काढल्या तरी जनतेच्या अडचणी समजायला हव्यात. यात्रेत जनतेच्या अडचणी समजून त्यानंतर यात्रा संपल्यावर असं एखादं पाऊल उचला की यात्रा सफल होईल. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छाही व्यक्त केली. मात्र कुठून, काय असा विचार केला नसल्याचे त्यांनी सांगितले. मी महिला प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे कोणत्याही ठिकाणी लढण्यास सांगितले तरी लढेन असेही त्यांनी स्पष्ट केले.