स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेच्या अटकेचा थरार कसा होता ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 09:28 IST2025-02-28T09:26:44+5:302025-02-28T09:28:27+5:30

जणू संपूर्ण गावाला पोलिसांनी वेढा घातला. कारण अंधार पडण्याच्या आता पोलिसांना त्याला पकडायचं होतं.

What was the thrill of the arrest of Datta Gade accused in the Swargate rape case? | स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेच्या अटकेचा थरार कसा होता ?

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेच्या अटकेचा थरार कसा होता ?

- किरण शिंदे

पुणे -
 स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला स्वारगेट पोलिसांनी शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. तीन दिवसांपासून आरोपी दत्तात्रय गाडेचा शोध पोलीस घेत होते. मात्र तो पोलिसांना चकवा देत होता. दत्तात्रय गाडे गुनाट गावातच लपला असल्याची खात्री पटल्यानंतर आणि पोलिसांनी या गावात मोठा पोलिस फौजफाटा बोलावला. जणू संपूर्ण गावाला पोलिसांनी वेढा घातला. कारण अंधार पडण्याच्या आता पोलिसांना त्याला पकडायचं होतं.



मात्र सायंकाळ झाली तरी आरोपीचा शोध लागत नव्हता. अंधार झाल्यानंतर पोलिसांनी सर्च ऑपरेशन थांबवण्याचे ठरवले. यानंतर पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास दत्तात्रय गाडे गावालगत असणाऱ्या शेतात पोलिसांना काही संशयास्पद हालचाल जाणवली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले, असता तो दत्तात्रय गाडे असल्याचे निष्पन्न झाले.

कसा होता त्याच्या अटकेचा थरार..

- ज्या शेतात दत्तात्रय गाडेला शोधण्यासाठी सर्च ॲापरेशन सुरु होतं तिथं तो नव्हताच, तिथं तो सापडलाच नाही

- दत्तात्रय गाडे रात्री नातेवाईक महेश बहीरट यांच्या घरी साडे दहा वाजता आला

- त्यानंतर तो आल्याची माहीती नातेवाईकांनी पोलिसांना दिली

- ⁠ दत्तात्रय गाडेने नातेवाईकांकडुन पाण्याची बाटली घेतली. आणि माझी मोठी चुक झालीय, मला सरेंडर करायचं असं सांगून तिथुन निघुन गेला

- त्यानंतर पोलीसांनी या घराच्या परीसरात दत्तात्रय गाडेचा शोध सुरु केला. डॅाग स्कॅाड ही त्याठिकाणी आणले

- पोलीसांना त्याचा बदलेला शर्ट सापडला , त्याचा वास डॅाग स्कॅाडला दिला

- त्याआधारे डॅाग स्कॅाडने पुढील रस्ता पोलीसांना दाखवला , पण गाडे ज्या ठीकाणावरुन आला होता, तिथे परतलाच नाही. तर तो नातेवाईकांच्या घराच्या परीसरात असलेल्या चारीमध्ये झोपून राहीला याच ठीकाणी तो ग्रामस्थांना आढळला. ग्रामस्थांनी तो दत्तात्रय गाडेच असल्याचं स्पष्ट केल्यानंतर पोलिसांनी दत्तात्रय गाडेला तत्काळ ताब्यात घेतलं

- दत्तात्रय गाडे ताब्यात आल्यानंतर पोलिसांनी लगेचच पुण्याकडे कुच केली.

- पहाटे २:५० वाजता त्याला घेऊन तपास पथकातील कर्मचारी लष्कर पोलिस ठाण्यात पोहोचले.

- काही वेळात वैद्यकीय तपासणीसाठी त्याला ससून रुग्णालयात नेण्यात आले.

Web Title: What was the thrill of the arrest of Datta Gade accused in the Swargate rape case?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.