शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

काय मौसम, काय मूड... जस्ट चिल आऊट यार; पुण्यात 'या' पावसाळी पर्यटनाला तरुणाईची पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 10:27 IST

सगळ्या बाजूंनी डोंगरदऱ्या, मस्त गुलाबी धुकं, हिरवीगार झाडी अशा कुंद वातावरणात तरुणाईचा ‘वन डे रिटर्न’ ट्रीपकडे जास्त ओढा

राधिका वळसे पाटील / सानिका बापट

पुणे : पावसाळा म्हटलं की तरुणांच्या भाषेत वाढीव कार्यक्रम. धबधबे, डोंगर, थंड हवा, धुके, पावसाची रिमझिम आणि बरसणाऱ्या सरी असा नादखुळा माहोल. अशा काय मौसम, काय मूड... या वातावरणात ‘चिल’ मारण्यासाठी तरुणाईची पावसाळी पर्यटनाला पसंती असते. पुण्याजवळ अशी अनेक ठिकाणे आहेत. या ठिकाणांवर तरुणाईची झुंबड पाहायला मिळत असून, ते पावसात चिंब होत एन्जॉय करण्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत.

सगळ्या बाजूंनी डोंगरदऱ्या, मस्त गुलाबी धुकं, हिरवीगार झाडी अशा कुंद वातावरणात तरुणाईचा ‘वन डे रिटर्न’ ट्रीपकडे जास्त ओढा आहे. पुण्याच्या आसपासचे माळशेज घाट, भीमाशंकर मंदिर, ताह्मिणी घाट, माथेरान, मुळशी, पवना धरण, महाबळेश्वर, कासारसाई धरण, देवकुंड धबधबा, कुंड मळा, कामशेत, लोणावळा, पानशेत, खडकवासला या ठिकाणांवर तरुणांचे लोंढे एन्जॉय करताना दिसत आहेत.

यासह लवासा सिटी, पवना धरण, पुण्यातील किल्ले, कासर्साई धरण, कामशेत, खडकवासला धरण, पानशेत धरण, सिंहगड, मुळशी, माथेरान इत्यादी. ठिकाणे तरुणाईसाठी प्रसिद्ध आहेत.

रोमँटिक ताह्मिणी घाट(पुण्यापासून ५३ किमी)

सह्याद्रीच्या कुशीतील ताह्मिणी घाट हे तरुणाईचं ‘फर्स्ट लव्ह’ आहे. ठिकठिकाणी ओसंडून वाहणारे धबधबे, धुक्याचे कुंद पांघरूण, त्या पांघरुणातून मधूनच डोकावणारी सूर्याची किरणे, पावसाची आल्हाददायक रिमझिम, वळणाचे रस्ते, बेभान वारा आणि त्यासोबत गरमागरम चहा आणि भजी किंवा भाजून तिखट-मीठ लावलेले कणीस यामुळे ताह्मिणी घाटाला तरुणाईची पहिली पसंती आहे.

कसे जाल? - चारचाकी, दुचाकी.काय खाल? - वाफाळलेला चहा, भाजलेले कणीस, मॅगी.

मनमोहक लोणावळा

(पुण्यापासून ६७ किमी)ताह्मिणी घाटानंतर महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील सर्वोत्तम पर्यटनस्थळ म्हणजे लोणावळा. समुद्रसपाटीपासून ६२५ मी. एवढ्या उंचीवर वसलेले हे ठिकाण आहे. जागोजागी नयनरम्य धबधबे, मनमोहक तलाव, किल्ले आणि निसर्गसंपन्न वातावरणाचा मनमुराद आनंद घेता येतो. राजमाची पॉईंट, भुशी धरण, टायगर पॉईंट, पवना लेक, कार्ला-भाजे लेणी आणि लोहगड किल्ला ही त्यातली सर्वांत आवडती ठिकाणे आहेत. विशेष आकर्षण-पॅराग्लायडिंग, बंजी जम्पिंगकसे जाल? - दुचाकी, चारचाकी, ट्रेन.

काय खाल? - वडापाव, कांदाभजी, मिसळ, चिक्की, कॉर्न भजी, इ.

कुंद माळशेज घाट(पुण्यापासून १२८ किमी)

निसर्गसौंदर्य आणि कुंद वातावरणाने पर्यटकांना आकर्षित करणारा माळशेज घट हे ही तरुणाईचे आवडते ठिकाण आहे. घनदाट जंगल, खोल दऱ्या, डोंगरकड्यांवरून कोसळणारे धबधबे व औषधी वनस्पतींची रेलचेल असलेले डोंगर हे इथलं आकर्षण. दऱ्यांमधील जंगलांमुळे इथे ससा, घोरपड, मुंगूस, हरीण, कोल्हा, बिबट्या यांचे दर्शन होते.

विशेष आकर्षण - जलाशयातील रोहित पक्षी (फ्लेमिंगो)कसे जाल? - रेल्वे, दुचाकी, चारचाकी

काय खाल? - चहा, भजी, मटक्यातले दही, भाजलेले कणीस, पिठलं भाकरी.

पवित्र भीमाशंकर(पुण्यापासून १०० किमी)

नैसर्गिक सौंदर्याने वेढलेले धार्मिक ठिकाण म्हणजेच भीमाशंकर. हे देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. पावसाळ्यात निसर्गप्रेमींसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. सुंदर फुले, निसर्गरम्य वातावरण, घनदाट जंगल, धुक्याने वेढलेला परिसर, ढगांच्या सान्निध्यात वावरणारे पर्यटक यासाठी हे प्रसिद्ध आहे.

विशेष आकर्षण - वन्यजीव अभयारण्यकसे जाल? - दुचाकी चारचाकी, बस.

काय खाल? - मासवडी, पिठलं भाकरी, लसणाची चटणी - भाकरी, कांदा भजी, मिसळ इ.

‘चिल्ड’ महाबळेश्वर(चौकट - पुण्यापासून ११७ किमी)

महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्वर हे राज्यातील सर्वाधिक पसंतीचे ‘हिल स्टेशन’ आहे. हिरवा निसर्ग, ‘चिल्ड’ वातावरण, सुंदर बगीचे, श्वास रोखायला लावणारी दृश्ये व अनेक सुंदर प्रेक्षणीय स्थळे पर्यटकांना आकर्षित करतात. रायगड, तोरणा या किल्ल्यांचे अतिशय मनमोहक दृश्य येथून दिसते. याच मार्गावर टायगर स्प्रिंग, इको पॉइंट, मॅप्रो गार्डन ही इथली वैशिष्ट्ये आहेत.

विशेष आकर्षण - एल्फिन्स्टन पॉइंट, सनसेट पॉइंट.कसे जाल? - दुचाकी, चारचाकी, बस.

काय खाल? - स्ट्रॉबेरी, बेरी विथ क्रीम, कॉर्न पॅटीस, भरलेले वांग आणि भाकरी, चना गरम इत्यादी.

तुमची धम्मालही शेअर करा

तुम्हीही मित्रांसोबत आऊटिंगला गेला असालच. तुम्ही भेट दिलेल्या स्पॉटविषयी नेमकी माहिती २०० शब्दांत आणि तुमच्या अशा ट्रीपचे फोटो आमच्यासोबत शेअर करा. त्यातील निवडक अनुभवांना फोटोसह प्रसिद्धी देण्यात येईल. माहिती आणि फोटो ९८८१०९८४३५ या नंबरवर पाठवावेत.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसenvironmentपर्यावरणSocialसामाजिकWaterपाणीMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान