शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव; कफ परेड आगीत एका मुलाचा मृत्यू, तीन जण रुग्णालयात; एकाची प्रकृती चिंताजनक
2
"भारताने इस्रायलकडून शिकायला हवे", RSS नेते भैयाजी जोशी नेमकं काय म्हणाले? धर्मांतरणावरही स्पष्टच बोलले!
3
'आमचा विश्वास कायद्यावर आहे, पण...' : जुबिन गर्ग यांच्या मृत्यूला एक महिना पूर्ण, तरीही गूढ कायम!
4
मालक असावा तर असा... या व्यक्तीनं दिवाळीला कर्मचाऱ्यांना वाटल्या ५१ लक्झरी कार्स
5
गेल्या महिन्यातच लाँच केलेली...! मारुतीने विक्टोरिसची किंमत वाढविली, पहा नेमकी किती...
6
दिवाळीच्या मुहूर्तावर शेअर बाजार सुस्साट; सेन्सेक्स ३१७ तर निफ्टीमध्ये ११५ अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
7
VIRAL : भीती नाही, थरार! एका व्यक्तीने १००हून अधिक विषारी सापांचा वाचवला जीव; Video पाहून नेटकरी हैराण
8
विकली जाणार देशातील 'ही' दिग्गज खासगी बँक; ₹२६,८५० कोटींची डील, UAE च्या या कंपनीच्या हाती येणार सूत्रं
9
कतारने मोठी चूक केली...! तालिबानने युद्धविरामातील एका शब्दावर तीव्र आक्षेप घेतला, निवेदन बदलण्याची वेळ आली...
10
'दीया और बाती' फेम अभिनेत्रीने ११ वर्षांचा संसार मोडल्यानंतर घेतला संन्यास, पदरात आहे एक मुलगा
11
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्र्म्प आणि युक्रेनच्या झेलेन्स्कींचे पुन्हा जोरदार भांडण; नकाशा बाजुला फेकला... 
12
हाँगकाँगमध्ये UAE चे कार्गो प्लेन रनवेवरून समुद्रात घसरले; विमानातील कर्मचारी वाचले, पण दोन ग्राउंड स्टाफचा मृत्यू
13
"जेव्हा हिचे हिरोईन म्हणून करिअर चालले नाही, तेव्हा...", राखी सावंतचा तमन्ना भाटियावर हल्लाबोल, म्हणाली - "लाज बाळग..."
14
Delhi AQI: दिवाळी सुरु नाही झाली तोच दिल्लीची हवा अतिविषारी बनली; आनंद विहारमध्ये गुणवत्ता ४१७ वर...
15
'त्या' तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कुणी कापला? अखेर उलगडा झाला! समोर आलं धक्कादायक सत्य
16
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
17
आजचे राशीभविष्य : सोमवार २० ऑक्टोबर २०२५; आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी लाभदायी, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठीही अनुकूल
18
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
19
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
20
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा

पुण्यात हे चाललंय काय! १२ विद्यार्थ्यांना उडवले; चालकाने मद्यपान केल्याची धक्कादायक माहिती समोर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 22:00 IST

सदाशिव पेठेतील भावे हायस्कुलजवळ रस्ते अतिशय अरुंद असूनही भरधाव कारने १२ जणांना उडवल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुणे : शहराच्या मध्यवर्ती भागात सदाशिव पेठेत असलेल्या भावे हायस्कूल जवळ एका कारचालकाने १२ जणांना उडविल्याची घटना शनिवारी (दि. ३१) सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास घडली. या घटनेत चालकाने मद्यपान केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मध्यवर्ती भागातून असे मद्यपी गाड्या चालवत असतील. तर सामान्य माणसाने रस्त्याने चालायचे कसे? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.  शहराच्या मध्यवर्ती भागात भावे हायस्कुल जवळ हा अपघात झाला आहे. या परिसरातील रस्ते अतिशय अरुंद आहेत. २ चारचाकी एकत्र आल्या तरी ट्राफिक झाल्याचे निदर्शनास आले आहे. अशा ठिकाणी हा भीषण अपघात घडला आहे. त्यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच मद्यधुंद चालकाने १२ जणांना उडवल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होऊ लागला आहे. सर्व जण जखमी झाले असून कोणत्याही प्रकारची जीवितहानी न झाल्याची माहिती समोर आली आहे.    

या घटनेत जखमी असलेले सर्वजण एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी असल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील चौघांचे फ्रॅक्चर झाल्याने संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, तर उर्वरित जखमींना शेजारील रुग्णालयातच दाखल केले आहे. चालक जयराम शिवाजी मुळे (वय २७, रा. बिबवेवाडी) याला विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात गेतले असून तो मद्यधुंद असल्याचे सांगितले जात आहे. जखमी विद्यार्थी एका चहाच्या टपरीवर चहासाठी एकत्रित आले होते. कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने बारा जणांना धडक दिली. प्राथमिक माहितीनुसार या बारा जणांपैकी तिघांना संचेती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर अन्य नऊ किरकोळ जखमींना योगेश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

कारचालकाची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी पोलिसांनी त्याला ससून रुग्णालयात नेले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. अविनाश दादासो फाळके ,प्रथमेश पांडुरंग पतंगे, संदीप सुनील खोपडे, सोनाली सुधाकर घोळवे, मंगेश आत्माराम सुरवसे, अमित अशोक गांधी, समीर श्रीपाद भालचिकर, सोमनाथ केशव मेरूकट, प्रशांत ब्रह्मदेव बंडगर, किशोर हरिभाऊ भापकर, पायल आदेश कुमार दुर्गे, गुलणाज सिराज अहमद अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत. 

जखमी १२ जणांचे जबाब घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. अजूनही दोन ते तीन जण रुग्णालयात आहे. चार ते पाच जणांना फ्रॅक्चर आहे. बाकीचे लोक जखमी आहेत. कारचालकासह सहप्रवासी दोघेही मद्य पिले असण्याची शक्यता आहे. चालक, सहप्रवासी आणि गाडीमालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. गाडीचा मालक आणि चालक यांच्यामधील कराराची कागदपत्रे तपासून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.- निखिल पिंगळे, पोलीस उपायुक्त, गुन्हे, प्रभारी परिमंडळ १

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातPoliceपोलिसcarकारsadashiv pethसदाशिव पेठCrime Newsगुन्हेगारी