शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

‘त्या’ भन्नाट प्लेक्सबाजीनंतर आता ‘गिरीश काय रे ?' बॅनरचा पुणे शहरात धुमाकूळ 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 1:35 PM

सध्या पुणे शहरात पाणी प्रश्न गंभीर होत चालला आहे..

ठळक मुद्देलक्षवेधी प्लेक्सने शहरात राजकीय चर्चांना उधाणया प्लेक्सबाजी मागे राजकीय पक्षाचा हात आहे का?, हे अद्याप अस्पष्ट

 पुणे: पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून भन्नाट प्लेक्सबाजी नागरिकांना पाहायला मिळते आहे. कधी शिवडे.. आय एम सॉरी.. तर कधी आपण यांना पाहिलत कां.? , ओ नगरसेवक भाऊ, तुम्हाला कुणीही रागावणार नाही, प्लिज, तुम्ही परत या... यांसारख्या मजकुरांच्या बॅनरने पुणे व पिंपरी-चिंचवड परिसर दणाणून सोडला. या प्लेक्सबाजीतून कधी मनोरंजन केले तर कधी राजकीय वातावरणात रंग भरले. सध्या पुणे शहरात पाणी प्रश्न गंभीर होत चालला आहे. याच पाणी प्रश्नावरून पालकमंत्री गिरीश बापट व महापालिकेतील सत्ताधारी भाजपाला या गिरीश काय रे.?, दुष्काळ असताना सुध्दा अजितने कधी शहराला पाणी कमी पडू दिले नाही. अशा मजकुराच्या बॅनरमधून लक्ष्य करण्यात आले आहे. शहराच्या पाणी वाटपावरून जलसंपदा विभाग आणि महापालिका यांच्यात मागील काही दिवसांपासून निर्माण झालेल्या वादातून आरोप-प्रत्यारोपांच्या फैैरी झाडू लागल्या आहेत. शहरातील विविध भागात हे प्लेक्स लावण्यात आले आहेत. या लक्षवेधी प्लेक्सने शहरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पाणी समस्येचा ढोल वाजवून भाजपाला नामोहरम करण्याची ही खेळी विरोधी पक्षांकडून खेळण्यात आलल्याचे ’खासगी ’त बोलले जात आहे. मात्र, या प्लेक्स खाली एक त्रस्त पुणेकर असा उल्लेख आहे. हे बॅनर कोणी लावले आहेत, या मागे राजकीय पक्षाचा हात आहे का?, हे अद्याप अस्पष्ट आहे. पाणीकपातीबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसून महापालिका वाढीव लोकसंख्येबाबत आराखडा तयार करत असल्याने पाण्याबाबत आठवडाभरात पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे.शहरात पाणीकपात निश्चित असली तरी नेमकी किती टक्के पाणीकपात होणार हे अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. याचधर्तीवर शहरात पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर टीका करणारे प्लेक्स लावण्यात आले आहे. हे बॅनर कोणी लावले आहेत, या मागे राजकीय पक्षाचा हात आहे का?, हे अद्याप अस्पष्ट आहे. 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाBJPभाजपाgirish bapatगिरीष बापटAjit Pawarअजित पवार