उधारीवर सिगारेट न दिल्याने धारधार शस्राने केले वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 05:10 PM2019-12-28T17:10:14+5:302019-12-28T17:14:10+5:30

उधारीवर सिगारेट न दिल्याने दोघांवर पालघनने वार करुन परिसरात दहशत पसरविण्याचा प्रकार

weopan attack due to not given up cigarettes on credit | उधारीवर सिगारेट न दिल्याने धारधार शस्राने केले वार

उधारीवर सिगारेट न दिल्याने धारधार शस्राने केले वार

Next

पुणे : उधारीवर सिगारेट न दिल्याने दोघांवर पालघनने वार करुन परिसरात दहशत पसरविण्याचा प्रकार महंमदवाडी रोडवर घडला. दोघांनी परिसरात दहशत पसरविल्याने दुकानदारांनी आपली दुकाने बंद केली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़. 
शाहरुख रहीन शेख ऊर्फ अट्टी (रा. हांडेवाडी, हडपसर) आणि स्वप्नील रतन पवार (रा. आदर्शनगर, धनकवडी) अशी त्यांची नावे आहेत. ही घटना हडपसरमधील महंमदवाडी रोडवर २६ डिसेंबरला रात्री आठ वाजता घडली़. याप्रकरणी मुनाफ सादिक शेख (वय २५, रा़ सय्यदनगर, महंमदवाडी) यांनी वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. 
याबाबत पोलिसांनी सांगितले की, मुनाफ शेख हे मित्राच्या पान टपरीवर थांबले असताना शाहरुख व स्वप्नील तेथे आले व त्यांनी पानटपरीचालक राजेश यांना उधारीवर सिगारेट पाकिट मागितले़. त्याला राजेश यांनी विरोध केला़. तेव्हा त्यांनी शेख व राजेश यांना मारहाण केली. शाहरुख याने आपल्या दुचाकीतून पालघनसारखे हत्यार काढून शेख यांच्यावर वार केले़. तसेच शिवीगाळ करुन धमकी दिली़ हातातील पालघन हवेत फिरवत परिसरात दहशत निर्माण केली़. त्यामुळे लोकांनी आपली दुकाने पटापट बंद केली़ यामुळे परिसरात पळापळ झाली़ वानवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

Web Title: weopan attack due to not given up cigarettes on credit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.