Pune Crime: रिव्ह्यू देऊन घरबसल्या पैसे मिळवायला गेला अन् लाखो रुपये गमावून बसला

By भाग्यश्री गिलडा | Published: July 24, 2023 04:45 PM2023-07-24T16:45:03+5:302023-07-24T16:45:41+5:30

काही प्रकरणांमध्ये संबंधित व्यक्तीला सायबर भामट्याने दिलेले ऑनलाईन लाईक,सबस्काईबचे टास्क पूर्ण केल्यानंतर कामाचे पैसे पाठविले...

Went to earn money from home by giving reviews and lost lakhs of rupees | Pune Crime: रिव्ह्यू देऊन घरबसल्या पैसे मिळवायला गेला अन् लाखो रुपये गमावून बसला

Pune Crime: रिव्ह्यू देऊन घरबसल्या पैसे मिळवायला गेला अन् लाखो रुपये गमावून बसला

googlenewsNext

पुणे : ऑनलाईन रिव्ह्यू देऊन पैसे मिळतील असे आमिष दाखवून वारजे परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. घर बसल्या पैसे कमावण्याच्या आमिषाला बळी पडून फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन सुरेश जाधव (वय ३०, रा. वारजे) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे जाधव यांना अनोळखी मोबाईल क्रमांकावरून ‘तुम्ही फक्त आम्ही दिलेल्या लिंकवर रिव्ह्यू देऊन सांगितलेले टास्क पूर्ण करा. तुम्हाला घर बसल्या पैसे मिळतील.” असा मेसेज आला.

जाधव यांनी होकार दिल्यावर सुरुवातील त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे टाकून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांनतर प्रीपेड टास्क आणि व्हीआयपी टास्क अशी वेगवेगळी करणे सांगून पैसे गुंतवणूक करण्यास सांगितले. मात्र एकूण ४ लाख ४७ हजार रुपये भरून सुद्धा काही काळानंतर परतावा मिळणे बंद झाल्याने जाधव यांनी विचारणा केली. त्यावेळी कोणताही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक कुलकर्णी पुढील तपास करत आहेत. 

गुंतवणुकीचे आमिष-
काही प्रकरणांमध्ये संबंधित व्यक्तीला सायबर भामट्याने दिलेले ऑनलाईन लाईक,सबस्काईबचे टास्क पूर्ण केल्यानंतर कामाचे पैसे पाठविले. तसेच याच कंपनीत पैसे गुंतवले तर पैसे चारपट परत मिळतील असे अमिष ददाखवून लोकांची फसवणूक करण्याचा फंडा सायबर चोरटे राबवत आहेत. कामाचे पैसे परत मिळत असल्याने आपल्याला मोठा फायदा होईल, या आशेने अनेक जण या फसव्या मोहात गुंतवणूक करतात. मात्र, एकदा पैसे मिळाले की सायबर भामटे थेट त्या व्यक्तीचे अकाऊंट ब्लॉक करून पसार होतात.

अशी घ्या काळजी...

  • अनओळखी नंबरवरून आलेल्या मेसेजला रिप्लाय करू नका. 
  • घरबसल्या फक्त रिव्ह्यू देऊन किंवा लाईक, सब्सक्राईब करून पैसे मिळत नसतात त्यामुळे अशा मेसेजकडे दुर्लक्ष करा. 
  • कोणत्याही ठिकाणी पैश्यांची गुंतवणूक करताना त्याची शहानिशा करणे गरजेचे आहे.

Web Title: Went to earn money from home by giving reviews and lost lakhs of rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.