Weather Update : राज्यात सर्वदूर पावसाचं जोरदार 'कमबॅक'; पुणे, रत्नागिरीसह या जिल्ह्यात 'ऑरेंज अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 08:41 PM2021-06-17T20:41:44+5:302021-06-17T20:42:58+5:30

हर्णे, राजापूर, गगनबावडा, महाबळेश्वर येथे अतिवृष्टी, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सर्वदूर पाऊस

Weather Update: Heavy Rain in the all state ; 'Orange Alert' in this district including Pune, Ratnagiri | Weather Update : राज्यात सर्वदूर पावसाचं जोरदार 'कमबॅक'; पुणे, रत्नागिरीसह या जिल्ह्यात 'ऑरेंज अलर्ट

Weather Update : राज्यात सर्वदूर पावसाचं जोरदार 'कमबॅक'; पुणे, रत्नागिरीसह या जिल्ह्यात 'ऑरेंज अलर्ट

googlenewsNext

पुणे : गेले काही दिवस पावसाकडे डोळे लावून बसलेल्या मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी बुधवारी सायंकाळपासून पावसाची जोरदार सुरुवात झाली असून हर्णे, राजापूर, गगनबावडा, कोयना, महाबळेश्वर येथे अतिवृष्टी झाली आहे. मराठवाड्यातही बर्‍याच ठिकाणी पाऊस झाला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने शुक्रवारसाठी ऑरेंज अलर्ट दिला असून तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

गुरुवारी सकाळी गेल्या २४ तासात हर्णे, राजापूर २००, चिपळूण १७०, वैभववाडी १६०, कणकवली, खेड, वाल्पोई १५०, कुडाळ, लांजा, मुळदे, पेडणे १३०, संगमेश्वर, देवरुख ११०, माणगाव, मुंबई, मुरुड, श्रीवर्धन १००, देवगड, म्हापसा, फोंडा, सांगे, सावंतवाडी, वेंगुर्ला येथे ९० मिमी पावसाची नोंद झाली होती. याशिवाय बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला आहे.

मध्य महाराष्ट्रातील गगनबावडा २८०, महाबळेश्वर २१०, आजारा १८०, राधानगरी १७०, चांदगड १६०, गडहिंग्लज, कराड, कोल्हापूर, सांगली ९०, शाहुवाडी, यावल ७०, वेल्हे ६० मिमी पाऊस झाला.
मराठवाड्यातील सोयेगाव ६०, औंधा नागनाथ, भूम, कळंब, मुदखेड, शिरुर कासार, सोनपेठ, वाशी ३० मिमी पाऊस पडला. 

विदर्भातील अकोला ४०, चिखली३० मिमी पाऊस झाला असून अनेक ठिकाणी हलका पाऊस झाला आहे. घाटमाथ्यावरील कोयना (पोफळी) २३०, डुंगरवाडी, ताम्हिणी ११०, धारावी १००, दावडी ८०, कोयना (नवजा), खंद, भिवपूरी, भिरा ६० मिमी पावसाची नोंद झाली आहे. 
गुरुवारी दिवसभर कोकण, मध्य महाराष्ट्र बर्‍याच ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस झाला. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पुणे १२, लोहगाव ८, कोल्हापूर ४, महाबळेश्वर ६६, सांगली १२, सातारा ५०, मुंबई १६, सांताक्रूझ ५८, अलिबाग ५, रत्नागिरी २०, पणजी ६, डहाणु ८५, परभणी १४, अमरावती २ आणि नागपूर येथे १ मिमी पावसाची नोंद झाली आहे. 

शुक्रवारी १८ जून रोजी कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून या तीनही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 
औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात वेगवान वार्‍यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पुणे शहरातही धुवाधार पावसाची बॅटिंग

शहरातील धनकवडी, सिह्गड रास्ता, धायरी, कात्रज, डेक्कन, शिवाजीनगर, कोथरूड, कर्वेनगर, वानवडी,वडगावशेरी, विमाननगर, येरवडा, वारजे माळवाडी हडपसर, पाषाण, बाणेर, यांसह विविध ठिकाणी सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू होती. दिवसभर रिमझिम पडणाऱ्या पावसाने सायंकाळी जोरदार हजेरी लावली, दोन दिवसांच्या ब्रेकनंतर उपनगरांमधील विविध भागात पावसाचं दमदार कमबॅक पाहावयास मिळाले.

 

 

Web Title: Weather Update: Heavy Rain in the all state ; 'Orange Alert' in this district including Pune, Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.