शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

Weather Update : मोठी बातमी! मॉन्सूनचे वारे कमकुवत; पुढील ७ दिवस देशभरातील बहुतांश भागात मोठ्या पावसाची शक्यता कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 7:06 PM

अनुकूल वातावरण नसल्याचा परिणाम, राज्यातील पाऊसमानही कमी राहणार

पुणे : मॉन्सूनचे वार कमकुवत असल्याने पुढील ७ दिवस मध्य भारत, उत्तर पश्चिम भारत, महाराष्ट्रासह दक्षिणेतील बहुतांश राज्यात मोठ्या पावसाची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. याच काळात उत्तरपूर्व भारतात पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

यंदा मॉन्सूनने नेहमीपेक्षा अधिक वेगाने वाटचाल करीत देशातील बहुतांश भागात आगमन केले. राजस्थानचा काही भाग, दिल्ली, हरियाना आणि पंजाबच्या काही भागात अजून मॉन्सून पोहचलेला नाही. सध्या मॉन्सूनची सीमा रेषा बारमेर, भिडवाडा, धुलपूर, अलिगड, मिरत, अंबाला आणि अमृतसर अशी आहे. १९ जूनपासून मॉन्सूनची वाटचाल थांबलेली आहे़.

सध्या मॉन्सूनच्या वाटचालीस अनुकूल वातावरण नाही. तसेच पश्चिम भागातील वार्‍यांची दिशा लक्षात घेता उत्तर पश्चिम भारत, मध्य भारतात २४ ते २६ जूनच्या दरम्यान मोठ्या पावसाच्या दृष्टीने अनुकूल स्थिती नाही. अरबी समुद्राकडून येणारे वारे कमकुवत असून त्यामुळे पुढील ७ दिवस मॉन्सूनचे वारे कमकुवत राहणार आहे. 

बंगालच्या उपसागरात ३० जूनपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची कोणतीही चिन्ह सध्या दिसून येत नाही. त्यामुळे देशातील मध्य भारत, पश्चिम भारत, दक्षिणेकडील राज्यात मोठ्या पावसाची शक्यता पुढील ७ दिवसात दिसून येत नसल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. गेल्या २४ तासात महाराष्ट्रात विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. कोकणात काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी पाऊस झाला आहे. मराठवाड्यात केवळ किनवट येथे १० मिमी पावसाची नोंद झाली आहे. विदर्भातील कुही ७०, भंडारा, भिवापूर, कोरपना, लाखनदूर, लाखनी, मौदा, पौनी ५० मिमी पावसाची नोंद झाली असून अनेक ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला आहे. बुधवारी दिवसभरात महाबळेश्वर ३८, रत्नागिरी ८, भंडारा २३, गोंदिया १३, वर्धा २ मिमी पावसाची नोंद झाली असून काही ठिकाणी हलका पाऊस झाला आहे. 

राज्यात पुढील तीन दिवस कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही. कोकण, गोव्यात बर्‍याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसweatherहवामानMonsoon Specialमानसून स्पेशलIndiaभारत