शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

ऊसाच्या FRP ची मोडतोड होऊ देणार नाही, वेळ पडल्यास राज्यव्यापी आंदोलन करू", राजू शेट्टी यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 14:55 IST

एफआरपीची मोडतोड करणे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करणारं आहे. त्यामुळे राज्य सरकारने या मोडतोडीला विरोध करावा.

ठळक मुद्देकेंद्राच्या शेती कायद्यात दुरूस्तीची गरज असून राज्याने दोन दिवसाच्या अधिवेशनात घाईने पाऊल उचलू नये

पुणे: ऊस ऊत्पादक शेतकऱ्यांना कारखान्यांनी त्यांच्या ऊसाची रास्त किंमत तीन हप्त्यात द्यावी असा केंद्र सरकारचा विचार आहे. त्यावर राज्याला शिफारस करायची आहे, आम्ही असा निर्णय होऊ देणार नाही. वेळ पडल्यास राज्यव्यापी आंदोलन करू असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना शेट्टी यांनी यासंदर्भात बुधवारी सकाळी निवेदन दिले. त्यानंतर पत्रकारांबरोबर बोलताना शेट्टी यांनी एफआरपीची मोडतोड करणे शेतकऱ्यांचे आर्थिक नूकसान करणारे आहे. असे सांगितले. निती आयोगाने ही हप्त्याची शिफारस केली आहे. अशा हप्त्यांमधून शेतकर्याचे त्यावर्षीचे पीक कर्ज फिटणार नाही, त्यामुळे त्याला १२ टक्के दराने व्याज द्यावे लागेल. त्यामुळे सध्या एकरकमी एफआरपी द्यावी लागते तेच योग्य आहे असे मत शेट्टी यांनी व्यक्त केले. राज्य सरकारने या मोडतोडीला विरोध करावा अशी मागणी त्यांनी केली.

 

राज्य सरकारने साखर कारखान्यांचे भागभांडवल १५ हजार रूपये केले. शेतकऱ्यांवर असा बोजा टाकण्याऐवजी कारखान्याचे संचालक व्हायचे असेल. तर २५ लाख भांडवल व २५ लाख कारखान्याकडे ठेव स्वरूपात, मुदत संपली की ते परत असा नियम व्हावा असे मत शेट्टी यांनी व्यक्त केले. १५ हजार रूपयांचे शेअर्स घेऊन ३०० कोटी रूपयांचे मालक व्हायचे धंदे आता बास करायला हवेत असे ते म्हणाले.

साखरेची किमान किंमत ३१ रूपये किलो निश्चित केली. त्यापेक्षा कमी किंमतीत साखर विकणे कायद्याने गुन्हा ठरवला आहे. आता दुधाच्या बाबतीतही हीच पद्धत राबवण्याचा विचार सुरू आहे. सर्वच शेती ऊत्पादनांबाबत सरकारने हीच पद्धत अवलंबावी असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. 

केंद्राच्या शेती कायद्यात दुरूस्तीची गरज

केंद्राच्या शेती कायद्यात दुरूस्तीची गरज आहे. परप्रांतीय धनदांडगे व्यापारी शेतकऱ्यांचा माल खरेदी करून नंतर पैसे देत नाहीत.  त्यांच्याविरोधात दाद मागणारी तरतुदच नाही. ५ कोटी बुडवायचे व २ वर्षे कैद घेऊन ते पचवायचे हे बंद व्हावे. त्यासाठी राज्याने कायदा करावा. केंद्राच्या कायद्यात घाईने दुरूस्ती करू नये. त्यासाठी शेतकऱ्यांचे मत विचारावे. दोन दिवसांच्या अधिवेशनात ही दुरूस्ती नको असे मत शेट्टी यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांकडे याची मागणी केली असल्याची माहिती त्यांनी दिली. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला ७ महिने झाले. केंद्र दखल घ्यायला तयार नाही. राज्य सरकारने दोन दिवसांच्या अधिवेशनात या आंदोलनाला पाठिंबा असल्याचा ठराव मंजूर करावा याचीही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे असे ते म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखानेGovernmentसरकारMLAआमदार