Pune Police: 'सगळ्या भाईला बाई करू आपण', वक्तव्यावरून खळबळ; पुण्यातील DCP रावले यांचा व्हिडिओ व्हायरल

By किरण शिंदे | Updated: April 8, 2026 13:41 IST2026-04-08T13:39:48+5:302026-04-08T13:41:01+5:30

Pune Police अवैध धंद्यांवर कारवाईचे आश्वासन देताना त्यांनी “भाईला बाई करू” असे अजब वक्तव्य केल्याने उपस्थितांमध्ये काही काळ गोंधळ निर्माण झाला

'We will marry all our brothers', stir over statement; Pune DCP Rawale's video goes viral | Pune Police: 'सगळ्या भाईला बाई करू आपण', वक्तव्यावरून खळबळ; पुण्यातील DCP रावले यांचा व्हिडिओ व्हायरल

Pune Police: 'सगळ्या भाईला बाई करू आपण', वक्तव्यावरून खळबळ; पुण्यातील DCP रावले यांचा व्हिडिओ व्हायरल

पुणे : पुण्यातील एका सामाजिक कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे पोलिस उपआयुक्त कृषीकेश रावले चर्चेत आले आहेत. अवैध धंद्यांवर कारवाईचे आश्वासन देताना त्यांनी “भाईला बाई करू” असे अजब वक्तव्य केल्याने उपस्थितांमध्ये काही काळ गोंधळ निर्माण झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पुणे शहरातील परिमंडळ १ चे उपआयुक्त कृषीकेश रावले हे एका सामाजिक कार्यक्रमात बोलत होते. यावेळी ते शहरातील अवैध धंदे, गुन्हेगारी आणि अमली पदार्थांच्या विळख्यात अडकलेल्या तरुणांबाबत बोलत होते.

अवैध धंदे करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देताना त्यांनी “हा भाई, तो भाई… सगळ्या भाईला बाई करू आपण” असे वक्तव्य केले. मात्र, लगेचच स्वतःची चूक लक्षात येताच त्यांनी ते सावरत स्पष्ट केले की, महिलांबद्दल काहीही अपमानास्पद बोलण्याचा त्यांचा हेतू नव्हता. त्यांनी आपले म्हणणे स्पष्ट करत सांगितले की, “महिलांबद्दल मी तसे बोलत नाहीये, पण गुन्हेगारांना ‘भाई’ म्हणून संबोधले जाते, त्याच संदर्भात ते वक्तव्य झाले.” दरम्यान, या कार्यक्रमात त्यांनी अमली पदार्थांच्या विळख्यात अडकलेल्या तरुणांची सुटका करण्यावरही भर दिला. अशा व्यक्तींना व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करून त्यांचे समुपदेशन केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी या वक्तव्यावर टीका केली आहे, तर काहींनी ते विनोदाच्या स्वरूपात घेतले आहे. एकीकडे पुणे पोलिसांकडून अवैध धंद्यांवर कारवाईचा इशारा दिला जात असताना, दुसरीकडे अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

Web Title : पुणे डीसीपी के 'भाई को बाई' बयान से विवाद, हंगामा खड़ा।

Web Summary : पुणे के डीसीपी कृषिकेश रावले का अवैध गतिविधियों पर बोलते हुए 'भाई को बाई बना देंगे' वाला बयान वायरल हो गया। उन्होंने स्पष्ट किया कि उनका इरादा महिलाओं का अपमान करना नहीं, बल्कि अपराधियों को लक्षित करना था। इस टिप्पणी पर मिली-जुली प्रतिक्रियाएँ आईं।

Web Title : Pune DCP's controversial 'Bhai to Bai' remark sparks outrage.

Web Summary : Pune DCP Krushikesh Rawale's statement, promising to 'turn Bhai into Bai' while addressing illegal activities, went viral. He clarified his intention wasn't to disrespect women, but to target criminals. The remark sparked mixed reactions.