माळेगाव येथील गोळीबार प्रकरणात तुम्हाला पण अडकवू; रणजित तावरे यांना धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 17:09 IST2021-07-10T17:03:16+5:302021-07-10T17:09:57+5:30
सोशल मीडियावर पोस्ट

माळेगाव येथील गोळीबार प्रकरणात तुम्हाला पण अडकवू; रणजित तावरे यांना धमकी
माळेगाव : रविराज तावरे गोळीबार प्रकरणी कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांचे पुतणे रणजित तावरे यांनी आपल्याला धमकी देण्यात आल्याचे सोशल मीडियावर पोस्ट लिहित आरोप केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा माळेगाव हादरले असून या प्रकाराची उलट सुलट चर्चा सुरु आहे.
रविराज तावरे यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर मोरे टोळीवर मोक्का लावण्यात आला. दोनच दिवसापूर्वी या प्रकरणात माजी सरपंच जयदीप दिलिप तावरे यांना अटक झाल्याने खोट्या गुन्ह्याबाबत समर्थकांकडून गाव बंद करण्यात आले. दरम्यान या प्रकरणी रणजित तावरे यांनी सोशल यावरुन संदेश पाठवत मला फिर्यादीच्या नातेवाईकांकडून तुला पण गुन्ह्यात अडकवु अशी धमकी येत असल्याबद्दल खुलासा केला आहे.या संदेशामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.सोशल मीडियातील चर्चेमुळे गोळीबार प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.या प्रकरणाचे पडसाद उमटण्याची शक्यता असल्याने पोलीस प्रशासनास सतर्क रहावे लागणार आहे.
रणजित तावरे यांची फेसबुक पोस्ट...
‘मला अप्रत्यक्ष ३१ मे च्या फियार्दीच्या निकटवर्तीयांकडून धमकी मिळत आहे की,आम्ही तुला या गुन्ह्यात अडकवु,मला जे कोणी आहेत त्यांना सांगणे आहे की, तुम्ही पाहिजेत ते खुशाल करा.हा पट्ट्या न डरेगा ना पिछे हटेगा कारण नीतिमत्ता स्वच्छ आहे.. हा संदेश व्हायलर होत आहे.’