शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

कायद्यातील तरतुदीपेक्षा आम्हाला समाजाने स्वीकारणे जास्त गरजेचे : सोनाली दळवी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2020 8:12 PM

आपल्याकडे लग्न जुळवताना जन्मकुंडली बघण्यापेक्षा मुलामुलींचे 'एचआयव्ही स्टेटस' बघणे जास्त आवश्यक

ठळक मुद्दे'थँक्यू सोनाली' या ११ मिनिटांच्या लघुपटात तृतीयपंथींचे हक्क, रक्तदान आणि एचआयव्ही या विषयावर आधारित

पुणे : सर्वोच्च न्यायालयाने ३७७ कलम रद्द केले असले  तरी  कायद्यातील तरतुदी पेक्षा आम्हाला समाजाने स्वीकारणे जास्त गरजेचे आहे.  एडस सारखा असाध्य रोग  फक्त तृतीयपंथी किंवा समलिंगी लोकांनाच होतो हा समाजातील गैरसमज दूर होण्याची गरज आहे. आपल्याकडे लग्न जुळवताना कुंडली, देवक या गोष्टी बघण्यापेक्षा मुलामुलींचे 'एच आय व्ही स्टेटस' बघणे जास्त आवश्यक आहे असे मत तृतीयपंथी कार्यकर्ती सोनाली दळवी यांनी व्यक्त केले.'थँक्यू सोनाली' या लघुपटामधे दळवी यांनी रक्तदात्याची भूमिका केली असून, त्या वैयक्तिक जीवनातही नियमित रक्तदाता आहेत. या लघुपटाचे प्रसारण आणि त्याचबरोबर लघुपटातून दिलेल्या सामाजिक संदेशासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या चर्चात्मक कार्यक्रमात त्या बोलत होत्या. हा ११ मिनिटांचा हा लघुपट तृतीयपंथींचे हक्क, रक्तदान आणि एच आय व्ही पॉझिटिव्ह या विषयावर आधारित आहे. या कार्यक्रमात पुण्यातील जनकल्याण रक्तपेढीचे व्यवस्थापक महेंद्र वाघ,  महाराष्ट्र राज्य एड्स कंट्रोल सोसायटी, पुणे जिल्ह्याचे कार्यक्रम व्यवस्थापक  प्रसाद सोनावणे, रक्तदान शिबिर आयोजिका डॉ. ज्योती शिंदे, लघुपटाचे दिग्दर्शक सचिन बिडवई आणि कलाकार राजवीर पाटील सहभागी झाले होते. या मान्यवरांशी लेखक / समीक्षक राज काझी यांनी संवाद साधला.   डॉ. ज्योती शिंदे यांनी महिलांच्या शरीरातील हिमोग्लोबिन ची मात्रा योग्य प्रमाणात असेल तर त्या नियमितपणे रक्तदान करू शकतात. इतर सर्व क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणा-या महिला रक्तदान करण्यासाठी मात्र पुढे येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. प्रसाद सोनावणे यांनी या वर्षीच्या संकल्पनेविषयी सांगितले. 'नो युवर स्टेटस'  आणि ' समाज बदल घडवतो' या दोन संकल्पनांवर आधारित विविध उपक्रम जनजागृती साठी जिल्हास्तरीय राबविले जाणार आहेत. शरीरस्वास्थ्यासाठी नियमितपणे सर्व प्रकारच्या शारीरिक तपासण्या करण्यासाठी जागरूक असलेला नागरिक 'एच आय व्ही चाचणी' साठी मात्र तेवढा जागरूक नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. एच आय व्ही ची लागण झालेल्या या अथवा एड्सग्रस्त रुग्णाला आपुलकीची आणि प्रेमाने स्वीकारण्याची गरज असते. या रुग्णांना स्पर्श केल्याने हा रोग होत नाही. त्यामुळे या रुग्णांना अस्पृश्य असल्यासारखी वागणूक देणे अत्यंत चुकीचे आहे. एच आय व्ही संदर्भात नागरिकांना कोणतीही माहिती हवी असल्यास १०९७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सोनावणे यांनी या वेळी केले.....माझ्यासमोर एका तृतीयपंथी व्यक्तीस मॉल मध्ये प्रवेश नाकारण्यात आला या एका घटनेवरून मला या लघुपटा साठी विषय सुचली. समाजामध्ये अनेक स्तरांवर तृतीयपंथीयांना विविध कारणासाठी नाकारले जाते. अगदी रक्तदाना सारख्या पवित्र आणि सामाजिक बांधिलकी जपणा-या उपक्रमांमध्ये सुद्धा त्यांना प्रवेश दिला जात नाही ही वस्तुस्थिती या लघुपटातून दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे- सचिन बिडवई, युवा दिग्दर्शक 

टॅग्स :PuneपुणेTransgenderट्रान्सजेंडरShort Filmsशॉर्ट फिल्म