Chandrakant Patil: भाजप - शिवसेना एकत्र येण्याची आमची इच्छाच नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 18:48 IST2021-11-15T18:34:06+5:302021-11-15T18:48:50+5:30
बाळासाहेबांबद्दलच माझं प्रेम हे राजकीय प्रेम नाही. शिवसेना आणि भाजप एकत्र येण्यासाठी तर हे प्रेम बिलकुलच नाही

Chandrakant Patil: भाजप - शिवसेना एकत्र येण्याची आमची इच्छाच नाही
पुणे : पुण्यात विक्रम गोखले यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ब्राम्हण महासंघाच्या वतीने त्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना गोखलेंनी भाजप - शिवसेना युतीवर भाष्य केले होते. शिवसेना - भाजप एकत्र येण्यासाठी माझे प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणाले होते. या वक्तव्यावर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.
''शिवसेना - भाजप एकत्र येण्याची आमची इच्छाच नाहीये. आणि आम्हाला शिवसेनेबरोबर निवडणुकाही लढवायच्या नाहीत असे ते म्हणाले आहेत. बाळासाहेबांबद्दलच माझं प्रेम हे राजकीय प्रेम नाही. शिवसेना आणि भाजप एकत्र येण्यासाठी तर हे प्रेम बिलकुलच नाही. प्रेम हे त्यांच्या कर्तृत्वामुळे श्रद्धेपोटी आहे. मी मुंबईत राहतो त्याठिकाणी चारही बाजूने मुस्लिम एरिया आहे. दंगे होयचे तेव्हा शिवसेना आम्हाला सुरक्षित ठिकाणी नारळवाडीत घेऊन जायची. ती शिवसेना आणि या शिवसेनेत फरक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे''
''कंगना रानौतबाबत बोलताना पाटील म्हणाले, कंगना रानौतने हे म्हणायला हरकत नाही. की मोदीजी आल्यापासून आम्हाला स्वातंत्र्याचा अनुभव आला. तिने १९४७ च्या स्वातंत्र्यावर टीका टिपण्णी करण्याचं काहीच कारण नाही. गोखले म्हणालेत तर देवेंद्र आणि आपण मिळून टॅली करून घ्यायला हरकत नाही. त्यात आम्हाला आमची कोणतीही चूक वाटत नाही. आमच्या १०५ जागा यांच्या ५६ मग मुख्यमंत्री कोण होयला पाहिजे हे सगळ्यांना माहीत आहे. आम्ही ताकदीने निवडणूक लढतो म्हणून एवढ्या जागा निवडून आणतो असेही ते यावेळी म्हणाले आहेत.''
काय म्हणाले होते गोखले
शिवसेना-भाजपाला एकत्र आणण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. फडणवीसांना मी स्वत: प्रश्न विचारलेले आहेत की अडीच वर्ष दिली असती तर तुमचं काय बिघडलं असतं किंवा शिवसेनेचं काय बिघडलं असतं? हे माझे प्रश्न मी त्यांना विचारलेले आहेत. मी स्वत: उद्धव ठाकरे आणि फडणवीसांची भेट घेऊन याबाबत नक्कीच बोलेन. कारण भाजपा-शिवसेना एकत्र यायलाच हवेत. तेच देशासाठी चांगलं आहे, असं ठाम मत विक्रम गोखले यांनी व्यक्त केले होते.