शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
3
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
4
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
5
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
6
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
7
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
8
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
9
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
10
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
11
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
12
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
13
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
14
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
15
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
16
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
17
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
18
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
19
लालूंच्या कन्येकडे १५.८२ कोटींची संपत्ती; कोणतेही कर्ज नाही
20
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला

हम पैदल घर जा रहे है, लेकीन कसम से फिर लौट के वापस नही आएंगे..

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2020 7:08 PM

ही दु:खदायक भावना आहे अलाहाबादला पायी चालत जाणाऱ्या मजुराची...

ठळक मुद्देपरप्रांतीय मजुरांची व्यथा : गावाला जाण्यासाठी करावी लागतेय पायपीट

भानुदास पऱ्हाड - शेलपिंपळगाव : कोरोना संसर्गजन्य रोगावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपूर्ण देशात 'लॉकडाऊन'चा तिसरा टप्पा सुरू आहे. मागील ४९ दिवसांपासून राज्यात संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील अनेक कारखाने तब्बल ४८ दिवस पुर्णत: बंद ठेवण्यात आले होते. परिणामी परप्रांतीय मजुरांचे हातचे काम बंद झाल्याने परवड टाळण्यासाठी त्यांनी आपापल्या गावी पायी पळ काढला आहे. "हम तो अपने गाव पैदल जा रहे है, लेकीन फिर कभी लौट के वापस नही आएंगे अशी दु:खदायक भावना अलाहाबादला पायी चालत जाणाऱ्या मजुराने  व्यक्त केली.     जिल्ह्यात पिंपरी - चिंचवड, चाकण, रांजणगाव, सणसवाडी आदी ठिकाणी महत्वाच्या शेकडो औद्योगिक वसाहती आहेत. अशा वसाहतींमध्ये मॅनपॉवरही मोठ्या प्रमाणात लागत असल्याने स्थानिक कामगारांव्यतिरिक्त परप्रांतीय कामगारांची मोठी झुंड याठिकाणी कार्यरत होती. मात्र मार्च महिन्यात राज्यात कोरोना व्हायरसची साथ आली. यापार्श्वभूमीवर राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ नुसार १३ मार्च २०२० पासून लागू करून खंड २, ३, व ४ मधील तरतूदीनुसार अधिसूचना निर्गमित करून जिल्ह्यात जमावबंदी लागू केली.

           त्यानंतर केंद्र सरकारनेही संपूर्ण देशात 'लॉकडाऊन' जाहीर केले. परिणामी परप्रांतीय मजुरांची कामाविना पोटाची परवड होऊ लागल्याने राज्यशासनाने पुढाकार घेऊन अशा गरजूंना मोफत जेवणाची सोय उपलब्ध करून दिली आहे. तर अनेक सेवाभावी संस्थाही अशा लोकांना किराणा किटचे वाटप करत आहेत. मात्र कोरोना संसगार्चा धोका कमी होत नसल्याने सद्यस्थितीत देशात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. परिणामी चाकण, पिंपरी चिंचवड, सणसवाडी, रांजणगाव आदी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या परप्रांतीय मजुरांनी पायी चालत आपापल्या घराची वाट पकडली आहे.   सध्या चाकण - शिक्रापूर, पुणे - नगर, पुणे - नाशिक, चाकण - तळेगाव महामार्गाव्यतिरिक्त अशा मार्गांना जोडणाऱ्या विविध रस्त्यांवरून परप्रांतीय मजुरांचे लोंढेच्या - लोंढे पायी चालत निघाले आहेत. गुरुवारी (दि.७) अशाच काही पायी चालत अलाहाबादला निघालेल्या दहा - पंधरा परप्रांतीय मजुरांशी लोकमत प्रतिनिधीने चर्चा केली असता ते म्हणाले, कंपनी बंद ठेवल्याने त्यांनी कामावरून काढले... ठेकेदाराने वाऱ्यावर सोडले... खोली भाडं देणे शक्य नसल्याने रूममालकाने खोल्या खाली करून घेतल्या... शासनाकडून आवश्यक सुविधा मिळेना... परिणामी गावाला जाण्याचा निर्णय घेतला...शारीरिक चाचण्या करून घेतल्या...मात्र आठ दिवस उलटूनही त्याचे अहवाल मिळेना.... अखेर पाच दिवसांपूर्वी मावळमधून पायपीट सुरू केली.... नाशिकला काहीतरी उपाययोजना होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. ................कामगारांचे होणारे स्थलांतर रोखण्यासाठी चाकण औद्योगिक वसाहतींमधील अनेक कारखाने दोन दिवसांपासून सुरू करण्यात आले आहेत. मात्र कारखाने सुरू होऊनही हजारो परप्रांतीय मजूर आपापल्या गावाला जात आहेत. एकंदरीतच परप्रांतीय मजुरांची काम करण्याची मानसिकता नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

टॅग्स :PuneपुणेKhedखेडChakanचाकणMIDCएमआयडीसीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस