शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आम्हालाही शेतकऱ्यांची चिंता; बच्चू कडूंनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकार मार्ग काढेल - अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 13:25 IST

पुण्यात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला असता अजित पवारांनी त्यांना आम्ही जे काही करता येईल ते राज्य सरकाराच्या वतीने करू असे आश्वासन दिले

पुणे : आम्हालाही शेकतकऱ्यांची चिंता आहे. कालच चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांची भेट घेतली होती. त्यावेळी बावनकुळे यांनी स्वतः त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर बोलणे करून दिले. त्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये. आता राज्य सरकारच्या वतीने एक समिती स्थापन केली जाईल. त्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी आम्ही जे काही करता येईल ते राज्य सरकारच्या वतीने करू असे अजित पवारांनी यावेळी सांगितले. 

पुण्यात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुणे मॉडेल स्कूल व मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमात गोंधळ घातला. त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. बच्चू कडू यांची प्रकृती खालावली आहे. सरकार अजूनही त्यांच्या उपोषणाची दखल घेत नाही. असे म्हणत कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून आले. महिला कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमस्थळी गोंधळ घातल्याचे दिसून आले. पोलिसांनी सर्वांना आवरण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाल्याचे यावेळी दिसून आले. काही वेळ पोलीस आणि कार्यकर्यांमध्ये झटपट झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. 

अजितदादांचा कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न 

अचानक कार्यक्रम सुरु असताना प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यानी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. बच्चू कडू अमरावतीला उपोषणला बसले आहेत. तरीही सरकार दखल घेत नाही. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी कार्यक्रम थांबवला होता. अखेर अजितदादांनी कार्यक्रमातच त्यांनी आश्वासन देऊन शांत करण्याचा प्रयत्न केला.    

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारagitationआंदोलनPoliceपोलिसPoliticsराजकारणBachhu Kaduबच्चू कडू