Pune Water Supply News: गुरूवारी 'या' भागातील पाणीपुरवठा बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 19:13 IST2021-12-27T19:13:46+5:302021-12-27T19:13:55+5:30

शुक्रवारी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार

The water supply in 'Ya' area was cut off on Thursday | Pune Water Supply News: गुरूवारी 'या' भागातील पाणीपुरवठा बंद

Pune Water Supply News: गुरूवारी 'या' भागातील पाणीपुरवठा बंद

पुणे : जलवाहिनीच्या स्थलांतराच्या कामामुळे येत्या गुरूवारी (दि़३०) कोथरूड भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी (दि़३१) येथे उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरूध्द पावसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, एफटीआयआय (प्रसारभारती) इमारतीच्या कामात अडथळा ठरत असलेली व कोथरूड भागाला पाणीपुरवठा करणारी ८०० मि़मी़व्यासाची मुख्य जलवाहिनी नव्याने स्थलांतरित करून आत्ताच्या जववाहिनीस जोडण्यात येणार आहे. यामुळे गुरूवारी कोथरूड भागातील डहाणुकर कॉलनी, रामबाग कॉलनी, सुतारदरा, किष्कींदानगर, जयभवानी नगर, कोथरूड गावठाण आदी परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.


 

Web Title: The water supply in 'Ya' area was cut off on Thursday