पुण्यातील 'या' भागाचा पाणीपुरवठा मंगळवारी बंद राहणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 19:04 IST2023-02-03T19:02:54+5:302023-02-03T19:04:06+5:30
बुधवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार

पुण्यातील 'या' भागाचा पाणीपुरवठा मंगळवारी बंद राहणार
पुणे: वानवडी शिंदे छत्री परिसरातील जल वितरण यंत्रणेतील अत्यावश्यक दुरूस्तीच्या कामासाठी, येत्या मंगळवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी लष्कर पंपींगच्या अखत्यारीतील हयसार्व्हीस व २८५ इएसआर टाकीवरील पाणी पूरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे ७ फेब्रुवारी रोजी लष्कर परिसरातील काही भागातील पाणीपुरवठा बंद राहणार असून, ८ फेब्रुवारी रोजी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरूध्द पावस्कर यांनी याबाबत माहिती दिली.
पाणी पुरवठा बंद असलेला भाग खालील प्रमाणे
लष्कर जलकेंद्र भाग, संपूर्ण कॅन्टोनमेंट बोर्ड परिसर, कमांड हॉस्पिटल परिसर, प्रभाग क्र. २५ मधील वानवडी गावठाण, एस.आर.पी.एफ. वानवडी, एस.व्ही.नगर, काळूबाई मंदिर परिसर सोलापूर रोड, सोपानबाग, उदयबाग, डाेबरवाडी व प्रभाग क्र.२१ मधील बी.टी.कवडे रोड.