शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

पुणे शहराच्या सर्व भागांतील पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 18:26 IST

शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार

ठळक मुद्देविद्युत व पंपिंग विषय तसेच बांधकामविषयक तातडीची दुरुस्तीची कामे होणार

पुणे: शहरातील सर्व भागांत गुरुवार (दि. २०) संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी (दि. २१) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे़. पर्वती जलकेंद्र पंपिंग, रॉ वॉटर पंपिंग, वडगाव जलकेंद्र तसेच लष्कर, एस.एन.डी.टी./वारजे जलकेंद्र, नवीन होळकर भामा आसखेड, चिखली रावेत पंपिंग येथील विद्युत व पंपिंग विषय तसेच बांधकामविषयक तातडीची दुरुस्तीची कामे करायची असल्याकारणाने २० मे रोजी संपूर्ण पुणे शहराचा पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग

भामा आसखेड जलकेंद्र परिसर: लोहगाव, विमाननगर, वडगावशेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा.

पर्वती जलकेंद्र भाग (पर्वती, पद्मावती, इंदिरानगर पंपिंग): शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट परिसर, पर्वतीदर्शन, मुकुंदनगर, पर्वतीगाव, सहकारनगर, सातारा रोड परिसर, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर परिसर, कर्वे रोड ते एसएनडीटी परिसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड आदी सर्व भाग.

वडगाव जलकेंद्र परिसर: हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक.

चतु:श्रृंगी/एस.एन.डी.टी./ वारजे जलकेंद्र परिसर: पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:श्रृंगी परिसर, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधन, बाणेर, चांदणी चौक परिसर, भुसारी कॉलनी, महात्मा सोसायटी, पुणे विद्यापीठ परिसर, वारजे हायवे परिसर, वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, बावधान, सूस, सुतारवाडी, भूगाव रस्ता.

लष्कर जलकेंद्र भाग:- लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता.नवीन होळकर व चिखली पंपिंग भाग :- विद्यानगर, टिंगरे नगर, कळस, धानोरी, लोहगाव, मुळा रोड.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWaterपाणीSocialसामाजिक