शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईच्या श्रावणातही झळा!

By admin | Updated: August 27, 2015 04:48 IST

भर पावसाच्या दिवसांत पिके करपू लागल्याने पाण्यासाठी ओरड सुरू असून, पिण्याच्या पाण्यासाठीही जिल्ह्यात पुन्हा ग्रामस्थांची वणवण सुरू झाली आहे. २९ टँकरने १५ गावे

पुणे : भर पावसाच्या दिवसांत पिके करपू लागल्याने पाण्यासाठी ओरड सुरू असून, पिण्याच्या पाण्यासाठीही जिल्ह्यात पुन्हा ग्रामस्थांची वणवण सुरू झाली आहे. २९ टँकरने १५ गावे व १५९ वाड्यावस्तांवर ५६ हजार ८९१ लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.पावसाळ्याच्या सुरुवातीला टँकर कमी होऊन १९ वर गेले होते. ती संख्या आता २९ झाली आहे. गेल्या महिनाभरात जिल्ह्यात पुन्हा १0 टँकर वाढले आहेत. यावरून पाणीटंचाई किती गंभीर होत आहे हे दिसून येते. शिरूर, दौैंड, इंदापूर व बारामती या तालुक्यांत २५ जूननंतर अद्याप पाऊसच पडला नाही. परिणामी पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. बारामती तालुक्यात सर्वाधिक १0 टँकरने ४ गावे व ७६ वाड्यावस्त्यांवर २१ हजार २६ लोकसंख्येला पाणीपुरवठा सुरू आहे. हे टँकर गेल्या महिनाभरापासून सुरू आहेत. मात्र, इंदापूर तालुक्यात टँकर गेल्या आठवडाभरात वाढले असून, बारामतीपाठोपाठ ९ टँकरने ५ गावे व १९ वाड्यावस्तांवर १५ हजार २६६ लोकसंख्येला पाणीपुरवठा सुरू आहे. पुरंदर तालुक्यात ५ टँकरने १ गाव ५१ वाड्यावस्तांवर १0 हजार ७११ लोकसंख्येला टँकर पाणी पुरवत आहेत. आंबेगाव तालुक्यात २ तर दौैंड, हवेली, पुरंदर, शिरूर तालुक्यात प्रत्येकी १ टँकर सुरू आहे. (प्रतिनिधी)टँकरची मागणी करून टँकर मिळत नसल्याची जिल्ह्यात ओरड आहे. जर मागणीप्रमाणे टँकर मिळाले असते तर पाणीटंचाई किती गंभीर आहे, हे समोर आले असते. जिल्ह्याधिकाऱ्यांनी प्रस्ताव द्या चार तासांत मंजूर करू, असे नुकतेच आश्वासन दिले आहे. त्यानुसार पावसाची स्थिती अशीच राहिली तर टँकरची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्याची शक्यता आहे.