भिगवण परिसरात जलसंपदा विभागाकडून अतिक्रमणांवर हातोडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 13:46 IST2026-01-03T13:46:41+5:302026-01-03T13:46:53+5:30

भिगवण राशीन रोडलगत जुने भिगवण गावठाण जवळ ही कारवाई करण्यात येत आहे

Water Resources Department cracks down on encroachments in Bhigwan area | भिगवण परिसरात जलसंपदा विभागाकडून अतिक्रमणांवर हातोडा

भिगवण परिसरात जलसंपदा विभागाकडून अतिक्रमणांवर हातोडा

भिगवण : इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात जलसंपदा विभागाकडून उजनी पाणलोट क्षेत्रातील अतिक्रमणांवर हातोडा फिरवण्यात आला. उजनी जलाशयाच्या भूसंपादन क्षेत्रात अतिक्रमण करून काहींनी व्यवसाय थाटले होते. याबाबत वेळोवेळी नोटीसा देण्यात आली असूनही अतिक्रमण हटविण्यात न आल्याने आज शनिवारी (दि३) रोजी अतिक्रमणांवर धडक कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.




अधिकच्या माहितीनुसार, भिगवण राशीन रोडलगत जुने भिगवण गावठाण जवळ ही कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये वीटभट्या, घरे, दुकाने पाडण्यात आली. गतवर्षी या अतिक्रमणांबाबत जलसंपदा विभागाच्या पळसदेव भिमा उपसा सिंचन शाखेचे उपविभागीय अभियंता नितीन मधुकर खाडे यांच्या फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला. खाडे यांनी भिगवण पोलीस स्टेशनला तक्रार देवून अतिक्रमण कारणांवर गुन्हा दाखल केला होता तरी देखील अतिक्रमणांमध्ये वाढ होत असल्याने ही धडक कारवाईला सुरुवात करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Web Title : भिगवन क्षेत्र में सिंचाई विभाग द्वारा अतिक्रमणों पर कार्रवाई

Web Summary : भिगवन के उजनी जलग्रहण क्षेत्र में सिंचाई विभाग ने अतिक्रमणों को ध्वस्त कर दिया। नोटिस के बावजूद, उजनी जलाशय के लिए अधिग्रहित भूमि पर व्यवसायों ने अतिक्रमण किया था। शनिवार को ईंट भट्टों, घरों और दुकानों पर कार्रवाई शुरू हुई। पहले भी अतिक्रमण को लेकर शिकायत दर्ज की गई थी।

Web Title : Demolition of Encroachments by Irrigation Department in Bhigwan Area

Web Summary : The Irrigation Department demolished encroachments in Bhigwan's Ujani catchment area. Despite notices, businesses had encroached on land acquired for the Ujani reservoir. Action commenced Saturday, targeting brick kilns, homes, and shops. A previous complaint was filed regarding the encroachments.