शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यातील 'या' तालुक्यांचा पाण्याचा प्रश्न मिटला; वीर धरणात निम्म्याहून अधिक पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 17:33 IST

नीरा खोऱ्यातील गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर आणि वीर या धरणांत सतत कमी-जास्त प्रमाणात विसर्ग सुरू असून, वीर धरणाच्या पाणी पातळीत समाधानकारक वाढ होत आहे

नीरा : पुणे जिल्ह्यातील पुरंदर, बारामती इंदापूर, सातारा जिल्ह्यातील खंडाळा फलटण तालुक्याला वरदान असलेल्या नीरा नदीवरील वीर धरणात आज रोजी निम्म्याहून अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. तर नीरा नदीच्या धरण साखळीतील चार धरणात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तब्बल ४९.४२ पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे नीरा नदीच्या काठावरील व डाव्या उजव्या कालव्या लगतच्या शेतकऱ्यांच्या शेतीला जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पाणी पुरवठा सुरळीत राहणार आहे.      नीरा खोऱ्यातील गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर आणि वीर या धरणांत सतत कमी-जास्त प्रमाणात विसर्ग सुरू असून, वीर धरणाच्या पाणी पातळीत समाधानकारक वाढ होत आहे. त्यामुळे नीरा खोऱ्यातील शेतकऱ्यांना ऐन उन्हाळ्यात शेतीला व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावणार नसल्यामुळे शेतकरी वर्ग समाधान व्यक्त करत आहे.      नीरा खोऱ्यातील धरणांमध्ये (दि.०६ एप्रिल) मागील वर्षी ४०.८२ टक्के पाणीसाठा होता. आजरोजी ४९.४२ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने शेतकऱ्यांना आगामी खरीप हंगामासाठी फायदा होणार आहे. पुणे, बारामती, इंदापूर तसेच सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण व पुढे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जीवनदायी ठरणाऱ्या नीरा नदीवरील गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर व वीर या धरणांचा मोठा आधार राहिलेला आहे. या धरणातील पाण्यावर अनेक शेतकऱ्यांची शेती अवलंबून आहे.

वीर धरणाच्या दोन्ही कालव्यातून सध्या विसर्ग सुरू आहे. नीरा डावा कालव्यात ८२७ क्युसेकने विसर्ग चालू आहे. तर नीरा उजवा कालवा १ हजार ५५० क्यूसेकने सुरू आहे. त्यामुळे नदीकाठचा व कालव्यावर शेती अवलंबून असलेला शेतकऱ्यांची सिंचनाचे अडचण दूर होणार आहे. - संभाजी शेडगे : कर्मचारी, वीर धरण प्रशासन

English
हिंदी सारांश
Web Title : Water woes end in Pune districts; Veer dam overflows.

Web Summary : Water availability in Veer dam ensures uninterrupted irrigation till June. With 49.42% storage across four dams, farmers in Pune, Satara, and Solapur districts breathe a sigh of relief as water scarcity concerns ease, benefiting upcoming Kharif season.
टॅग्स :PuneपुणेPurandarपुरंदरBaramatiबारामतीIndapurइंदापूरDamधरणRainपाऊसFarmerशेतकरी