जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाणी वाया; शिवाजीनगर, सदाशिव पेठ, दांडेकर पुलाचा पाणी पुरवठा विस्कळीत
By राजू हिंगे | Updated: February 16, 2025 18:35 IST2025-02-16T18:34:51+5:302025-02-16T18:35:01+5:30
पुणे महापालिकेची दांडेकर पूल परिसरातून ७०० मिलिमीटरची जलवाहिनी गेली आहे.

जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाणी वाया; शिवाजीनगर, सदाशिव पेठ, दांडेकर पुलाचा पाणी पुरवठा विस्कळीत
पुणे : पुणे महापालिकेची ७०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी दांडेकर पूल परिसरामध्ये फुटली. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. त्यामुळे शिवाजीनगर, सदाशिव पेठ, दांडेकर पूल या परिसराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला. रात्री उशिरापर्यंत या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू होते.
पुणे महापालिकेची दांडेकर पूल परिसरातून ७०० मिलिमीटरची जलवाहिनी गेली आहे. ही जलवाहिनी रविवारी रात्री दीडच्या सुमारास फुटली. त्यामुळे या रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत होते. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. त्याने शिवाजीनगर, सदाशिव पेठ, दांडेकर पूल या परिसराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला. या जलवाहिनीचा पाणी पुरवठा थांबविण्यात आला. त्यानंतर या जलवाहिनीचे काम हाती घेण्यात आले.
रात्री उशिरापर्यंत या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल, असे पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितले.