शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

दूरदृष्टीच्या अभावामुळे पाणीकपातीचे संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 04:08 IST

गळतीची आकडेवारी फसवी; २४ तास पाणीपुरवठा योजना प्रत्यक्षात उतरणार कशी?

पुणे : महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने पुणे महापालिकेच्या अपिलावर निर्णय देताना शहराला ६३५ एमएलडी पाणी देण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे पुण्यावर पाणीकपातीचे संकट ओढवले आहे. ही वेळ का आली याचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. विस्तारणारे शहर, वाढती लोकसंख्या, झपाट्याने वाढणारी उपनगरे, उद्योग व्यवसाय याचा विचार करून भविष्यकालीन पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन अद्याप पालिकेने कोणताही आराखडाच तयार केला नसल्याचे समोर आले आहे. शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा होण्याचे संकेत मिळत असल्याने २४ तास पाणीपुरवठ्याची महत्त्वाकांक्षी योजना कशी सफल होणार हा प्रश्न आहे.पुणे शहराला ११.५० टीएमसी पाणी मंजूर करण्यात आलेले आहे. सध्या आवश्यकतेपेक्षा पुणे शहराला तीन ते चार टीएमसी अधिक पाणी लागत असल्याची ओरड जलसंपदा विभागाकडून केली जाते. जर शहराला १५ ते १६ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे, तर मग ही गरज भागविण्यासाठी शासनदरबारी पालिकेने काय मागण्या केल्या, काही प्रस्ताव शासनाला सादर केला होता हे सारे प्रश्न अनुत्तरित आहेत. प्राधिकरणाने पालिकेला शासनाकडून कोटा वाढवून घेण्याच्या सूचना केल्या असल्या तरी त्यावर अंमलबजावणी कशी आणि कधी होणार हा प्रश्न आहे.जलसंपदा विभागाचे अधिकारी सापत्न असल्याचा आरोपही सामाजिक कार्यकर्त्यांमधून होऊ लागला आहे. विठ्ठल जराड यांच्या याचिकेवर टी. एन. मुंडे यांना सुनावणी घेण्याचा अधिकार नाही. प्राधिकरणाकडे पालिकेने दाद मागण्याची आवश्यकताच नव्हती असे ‘आपले पुणे’ या संस्थेचे म्हणणे आहे. े मुंढे यांच्याविरोधात लोकायुक्तांकडे तक्रार दाखल करणे गरजेचे होते.भामा आसखेडमधून पुणे शहराला २०० एमएलडी पाणी मिळणार होते. मात्र, शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे हा प्रकल्प लांबला. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या मध्यस्थीनंतर आळंदीसाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या पाण्याचा नगर रस्ता परिसराला फायदा होणार आहे. मात्र, अनेक वर्षांपासून हा प्रकल्पही अधांतरीच लटकलेला आहे. जिल्हा प्रशासनाकडूनही प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाबाबत ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीत.पुणे शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. उपनगरांची वाढही जलदगतीने होत आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे उभी राहत आहेत. येथे वास्तव्यास येणाºया लोकसंख्येला लागणारे पाणी कुठून येते याचा कोणीही शोध घ्यायचा प्रयत्न करीत नाही. यासोबतच शहरामध्ये एक ते दीड लाख नळजोड बेकायदा असल्याची पालिकेही अधिकृत माहिती आहे. त्यामुळे हे नळजोड कसे दिले गेले, कोणी त्यासाठी प्रयत्न केले याचाही शोध घेणे आवश्यक आहे.शहरासाठी असलेल्या पाच धरणांच्या पाण्यावर पालिकेसोबतच काही ग्रामपंचायती, नगरपरिषदा, इंदापूरपर्यंतचे सिंचन, पाच साखर कारखाने, एमआयडीसीमधील कंपन्या, नांदेड सिटी, डीएसके विश्व अशा सोसायट्या असे जवळपास २०० ग्राहक आहेत. त्यामुळे पुण्याला मीटरचा निकष लावताना शेतीला किती पाणी दिले जाते, साखर कारखान्यांकडून किती पाणी वापरले जाते याचे मोजमाप ठेवले जाते का, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी केला आहे. दरवेळी मुंढवा जॅकवेलच्या पाच टीएमसी पाण्याचा विषय पुढे केला जातो. मात्र, मुंढवा जॅकवेलचा या सगळ्याशी कोणताही संबंध नाही. लोकप्रतिनिधी कालवा समितीच्या बैठकीत या विषयावर अजिबात बोलत नसल्याचेही वेलणकर यांनी सांगितले.गेल्या वर्षी पाऊस भरपूर झाल्याने धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली होती. मात्र, या वर्षी पाऊस कमी प्रमाणात पडला. आॅगस्ट अखेरपर्यंत धरणे ९० टक्के भरलेली होती. त्यानंतर पाऊस थांबल्यावर नदीमध्ये पाणी सोडणे थांबविण्यात आले. मात्र, कालव्यामधून पाणी सोडणे सुरुच होते. २८ सप्टेंबरला कालवा फुटल्यानंतरच हे आवर्तन बंद करण्यात आले. तोपर्यंत २८ दिवसात जवळपास दोन ते अडीच टीएमसी पाणी कालव्याद्वारे सोडण्यात आले होते. वास्तविक त्यासाठी कोणाचीही मागणी नव्हती. शेतीला मोठ्या प्रमाणावर आवर्तने सोडण्यात आली. काही दिवसांपूर्वी आमदार मेधा कुलकर्णी यांनी शहराच्या वाढती लोकसंख्या आणि पाण्याची गरज लक्षात घेता शहराला १६ टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली होती. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईPuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका