राज्यात पुढील ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा, ९ जिल्ह्यांना रेड अलर्ट ; NDRF च्या १५ तुकड्या तैनात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 09:08 PM2022-07-08T21:08:40+5:302022-07-08T21:09:36+5:30

एनडीआरएसच्या ९ तुकड्या कायमस्वरूपी तैनात...

Warning of heavy rains in the next 3 days in the state, red alert to 9 districts; Deployed 15 units of NDRF | राज्यात पुढील ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा, ९ जिल्ह्यांना रेड अलर्ट ; NDRF च्या १५ तुकड्या तैनात

राज्यात पुढील ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा, ९ जिल्ह्यांना रेड अलर्ट ; NDRF च्या १५ तुकड्या तैनात

Next

पुणे : राज्यात पुढील ३ दिवस (११ जुलैपर्यंत) अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १५ तुकड्या तैनात असून त्यापैकी ९ तुकड्या कायमस्वरूपी तैनात आहेत.

आज रात्री उशीरापर्यंत (शुक्रवारी) कोकण किनारपट्टीवर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोकणसह घाटातील काही जिल्ह्यांतही अतिवृष्टीचा इशारा दिला गेलाय. राज्यातील पालघर, ठाणे,  पुणे,  रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि मुंबई जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.

९ जुलैला राज्यातील रायगड पुणे, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर कोल्हापूर, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे आणि मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.

१0 आणि ११ जुलैला कोकणसह पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे. 

Web Title: Warning of heavy rains in the next 3 days in the state, red alert to 9 districts; Deployed 15 units of NDRF

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.