आंध्रातून ‘गुड न्यूज’; आता लक्ष्य यूपी, महाराष्ट्रासह काही राज्यांत जागा घटण्याच्या अहवालांमुळे भाजपने बदलली रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 06:53 AM2024-05-24T06:53:30+5:302024-05-24T06:54:43+5:30

अब की बार ४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपला लोकसभा निवडणुकीत काही राज्यांमध्ये फटका बसत आहे. काही राज्यांमध्ये जागा कमी होणार असल्याचे अहवाल आल्याने भाजपमध्ये अस्वस्थता आहे.

'Good News' from Andhra; Now focusing on Uttar Pradesh, BJP has changed its strategy due to reports of loss of seats in some states including Maharashtra | आंध्रातून ‘गुड न्यूज’; आता लक्ष्य यूपी, महाराष्ट्रासह काही राज्यांत जागा घटण्याच्या अहवालांमुळे भाजपने बदलली रणनीती

आंध्रातून ‘गुड न्यूज’; आता लक्ष्य यूपी, महाराष्ट्रासह काही राज्यांत जागा घटण्याच्या अहवालांमुळे भाजपने बदलली रणनीती

संजय शर्मा -

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल, ओडिशानंतर आता दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या आशा वाढल्या आहेत. महाराष्ट्रासारख्या काही राज्यांमध्ये जागांचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी भाजपने आता उत्तर प्रदेशमध्ये आपली सर्व ताकद पणाला लावली आहे.

अब की बार ४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपला लोकसभा निवडणुकीत काही राज्यांमध्ये फटका बसत आहे. काही राज्यांमध्ये जागा कमी होणार असल्याचे अहवाल आल्याने भाजपमध्ये अस्वस्थता आहे. ३७० जागा येतील की ३०० पेक्षा कमी जागा येतील? स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असणारा जादुई आकडा २७२ पर्यंत जाईल की, २५० पर्यंतच जागा जिंकता येतील या प्रश्नांनी भाजप नेत्यांना छळले आहे.

...येथे आनंदाची बातमी
- पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये किती जागा वाढणार हे निश्चित आहे. मात्र आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधून भाजपासाठी आनंदाची बातमी आली आहे. 
- आंध्र प्रदेशात भाजपचा नवा सहकारी तेलुगू देसम पक्ष चांगली कामगिरी करत आहे आणि भाजपलाही त्याच्याशी युती केल्याचा फायदा होत आहे. आंध्रमध्ये भाजप दोन ते तीन जागा जिंकू शकतो, असा अंदाज आहे.

महाराष्ट्रामध्ये जागा कमी होणार? 
- २०१९ च्या तुलनेत यावेळी भाजपला यावेळी २०२४ मध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक, हरयाणा, राजस्थानमध्ये कमी जागा मिळण्याचा अंदाज आहे.
- ज्या राज्यांमध्ये भाजपच्या जागा वाढू शकतात, त्यामध्ये पश्चिम बंगाल, ओडिशा, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

उत्तर प्रदेशवर लक्ष केंद्रित
आता शेवटच्या टप्प्यातील मतदानासाठी भाजपने उत्तर प्रदेशात आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. नरेंद्र मोदी स्वतः वाराणसीत तळ ठोकून उत्तर प्रदेशातील १३ लोकसभा जागांवर आपले लक्ष केंद्रित करणार आहेत.

पंतप्रधान मोदींच्या आधीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उत्तर प्रदेशात पोहोचत असून, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना हिमाचल प्रदेश आणि पंजाबवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे.

पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आता मतदानाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत उत्तर प्रदेशातच राहणार आहेत. १ जून रोजी अंतिम फेरीच्या मतदानासाठी ३० मे रोजी निवडणूक प्रचार संपणार आहे.

तेलंगणात किती जागा वाढणार?
- तेलंगणातून भाजपसाठी निवडणूक सर्वेक्षण करणारे नेते जीव्हीएल नरसिंह राव यांनी दावा केला आहे की, तेलंगणात भाजपच्या जागा चारवरून वाढत आठ ते दहा होऊ शकतात.
- राव हे भाजपचे राज्यसभा खासदार आहेत. आंध्र प्रदेशात टीडीपी १५ जागा जिंकू शकते असा त्यांचा दावा आहे.
 

Web Title: 'Good News' from Andhra; Now focusing on Uttar Pradesh, BJP has changed its strategy due to reports of loss of seats in some states including Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.