शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
2
आजचे राशीभविष्य : ०३ जून २०२५; हट्टीपणा सोडून द्या, कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घ्याल
3
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
4
सातव्या आयोगातील त्रुटी दूर, पण थकबाकी नाही; सुधारित वेतनश्रेणी १ जूनपासून लागू
5
पडघा, बोरीवलीत ATSचे छापे; १२ ताब्यात; पहाटे २ ते दुपारी ४ पर्यंत सुरु होते कोम्बिंग ऑपरेशन
6
१६ तास जनावरांसारखं 'काम' अन् ३००-४०० रुपये 'दाम'; दिवसभरात एक जोडपे तोडते तब्बल २ टन ऊस
7
सिक्कीममध्ये भूस्खलनात ३ जवानांचा मृत्यू, ६ बेपत्ता; लाचेनमध्ये १०० हून अधिक लोक अडकलेले
8
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश
9
रायगडात 'नॅपकिन'वरून राजकारण तीव्र; भरत गोगावलेंनी पुन्हा सुनील तटकरेंना डिवचले
10
बफर झोनमध्ये बेकायदा इमारती; हजार कोटींच्या घोटाळ्याचा संशय; वॉचडॉग फाउंडेशनकडून चौकशीची मागणी
11
अभिनेता एजाज खानच्या अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालयात उन्हाळी सुट्टीनंतर होणार सुनावणी
12
CSMT स्थानकात आता 'दिव्यांग फ्रेंडली' सुविधा; तिकीट काउंटर, पार्किंग, शौचालयांमध्ये सोय
13
रणजित कासलेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयाबाहेर सरकारविरोधात घोषणा
14
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
15
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
16
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
17
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
18
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
19
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
20
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई

'नव्या लालपरी'तून आठ वर्षांनंतर होणार वारकऱ्यांचे श्री विठ्ठल दर्शन  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 09:27 IST

विठ्ठलाच्या दर्शनाला जाणाऱ्या वारकऱ्यांना 'नव्या लालपरी 'तून प्रवास असून, त्याचे नियोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.

पुणे : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात (एसटी) आषाढी वारी आणि दिवाळी पूर्वी नवीन बस दाखल होत होते. परंतु, २०१६ नंतर एसटी महामंडळाकडून नवीन बसची खरेदी झाली नव्हती. यंदा मात्र राज्यातील सर्व आगारांत एसटीच्या ताफ्यात नव्या लालपरी दाखल होत आहेत. त्यामुळे यंदा वारीच्या काळात नव्या लालपरी धावणार आहेत, त्यामुळे विठ्ठलाच्या दर्शनाला जाणाऱ्या वारकऱ्यांना 'नव्या लालपरी 'तून प्रवास असून, त्याचे नियोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.आषाढी वारीसाठी राज्य आणि राज्याबाहेरील लाखो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. या काळात एसटी महामंडळाकडून राज्यातील सर्व आगारांतून जादा बस सोडण्यात येते. विशेषतः पुणे विभागातून पंढरपूरसाठी मागील वर्षी ३८० बस सोडण्यात आले होते. बसच्या सोयीमुळे वारीसाठी लाखो भाविक पुण्यातून विठ्ठल दर्शनाला जातात. गेल्या आठ वर्षापासून पुणे विभागात नवीन लालपरी दाखल झाले नाही. भाविकांना जुन्या बसमधूनच प्रवास करावा लागत होता. परंतु, यंदा पुणे विभागात ६५ लालपरी नव्याने दाखल झाले असून पुढील महिन्यात तेवढ्याच बस दाखल होतील.   

पुण्यातून दर्शनाला जाणाऱ्या वारकऱ्यांची संख्या जास्त असते. त्याचे नियोजन होत आहे. यंदा पुणे विभागातून पंढरपूरला नव्या बस सोडण्यात येणार असल्याने भाविकांचा आरामदायी प्रवास होईल. - अरुण सिया, विभाग नियंत्रक, पुणे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSwargateस्वारगेटPandharpurपंढरपूर