Pandharpur Wari: यंदाही पायी वारी रद्द, १० मुख्य पालख्या विठुरायाच्या भेटीसाठी बसनेच जाणार; आषाढीबाबत मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 12:53 IST2021-06-11T11:32:00+5:302021-06-11T12:53:51+5:30

कॅबिनेट मध्ये निर्णय घेतल्याची अजित पवारांची माहिती

Wari by bus this time as well. More people to be allowed | Pandharpur Wari: यंदाही पायी वारी रद्द, १० मुख्य पालख्या विठुरायाच्या भेटीसाठी बसनेच जाणार; आषाढीबाबत मोठा निर्णय

Pandharpur Wari: यंदाही पायी वारी रद्द, १० मुख्य पालख्या विठुरायाच्या भेटीसाठी बसनेच जाणार; आषाढीबाबत मोठा निर्णय

आषाढी वारी यंदाही बस नेच जाऊ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वर्षी मात्र प्रमुख पालखी सोहळ्यात जास्त लोकांना जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली.

आषाढी वारी संदर्भात नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाल्या नंतर कॅबिनेट बैठकीत चर्चा करून वारी संदर्भात निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची माहिती अजित पवारांनी आज दिली. यंदा पायी वारी ला परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र यंदा देखील वारी बस नेच जाईल असा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये १० महत्वाच्या पालखी सोहळ्याला परवानगी देण्यात आली आहे. 

दहा मानाचा पालख्यांपैकी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला, तसेच तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात प्रस्थानाला एकुण १०० लोकांना तर इतर पालख्यांमध्ये ५० जणांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर दोन्ही सोहळ्याचा एकुण ६० लोकांना बस ने पंढरपूर ला जाता येईल.वाखरी पर्यंत हा पालखी सोहळा बस ने जाईल तर पूजा गेल्या वेळ प्रमाणे होईल.  पूजेसाठी फक्त ५ जणांना परवानगी असेल 

महाद्वार काल्याला यंदा परवानगी देण्यात आली आहे. तर रथोत्सव सध्या पद्धतीने होईल असे पवार यांनी सांगितले.

पवार म्हणाले," अनेक जणांची यंदा पायी वारी साठी मागणी होती. मात्र ते करू नये अशी अनेक ग्रामस्थांनी मागणी केली. पायी वारी असेल तर दर्शनाची गर्दी टाळता येत नाही.त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे."

दहा मानाच्या पालख्यांची नावे:

१ -  संत निवृत्ती महाराज ( त्रंबकेश्वर )

२ -  संत ज्ञानेश्वर महाराज ( आळंदी )

३ -  संत सोपान काका महाराज ( सासवड ),

४ -  संत मुक्ताबाई ( मुक्ताईनगर )

५ -  संत तुकाराम महाराज ( देहू )

६ - संत नामदेव महाराज ( पंढरपूर )

७ - संत एकनाथ महाराज ( पैठण )

८ - रुक्मिणी माता ( कौडानेपूर -अमरावती )

९ - संत निळोबाराय ( पिंपळनेर - पारनेर अहमदनगर )

१० - संत चांगटेश्वर महाराज ( सासवड )

Web Title: Wari by bus this time as well. More people to be allowed