शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

प्रभाग रचना बदलायलाच हवी! सर्वपक्षीय गटनेत्यांचा अजित पवारांच्या भूमिकेला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2020 12:00 PM

राज्यामध्ये 2014 साली सत्ता बदल झाल्यानंतर महापालिकांच्या प्रभाग रचनेमध्ये बदल करण्यात आला होता.

पुणे : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवारांच्या निश्चितीपासून प्रभाग रचनेच्या बदलापर्यंतच्या चर्चांना सध्या उधाण आलेले आहे. त्यातच पालकमंत्री अजित पवार यांनी रविवारी प्रभाग रचना बदलणार असल्याचे वक्तव्य पुण्यात केले. त्यानंतर, सर्वपक्षीय गटनेत्यांनी प्रभाग रचना बदलणे आवश्यक असून भारतीय जनता पक्षाने चुकीच्या पध्दतीने केलेल्या बदलामुळे विकासावर विपरीत परिणाम झाल्याचा सूर आळवला आहे.

राज्यामध्ये 2014 साली सत्ता बदल झाल्यानंतर महापालिकांच्या प्रभाग रचनेमध्ये बदल करण्यात आला होता. 2017 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये हा बदल अंमलात आणला गेला. दोन वरुन चार सदस्यांवर गेलेल्या प्रभाग रचनेमुळे भाजपाला अपेक्षित यश मिळाले. तर, राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता गेली. कॉंग्रेस आणि शिवसेनेला तसेच मनसेलाही अपेक्षित  यश मिळाले नाही. चार सदस्यांच्या प्रभाग पद्धतीमुळे विकासकामांवर परिणाम झाल्याचे पहायला मिळाले. एकाच पक्षातल्या तसेच वेगवेगळ्या चारही नगरसेवकांमधील समन्वयाचा अभाव, स्पर्धा प्रकर्षाने जाणवत राहिली. विरोधी पक्षांकडून तर प्रभाग रचना बदलण्याची आणि चुकीच्या पद्धतीने झाल्याची टीका मागील तीन वर्षांपासूना सुरु आहे. पालकमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे या मागणीला जोर चढला आहे.====प्रभागाची रचना करताना सर्वसंमतीने केली जाते. खरेतर एक सदस्यिय प्रभाग असावा. एका नागरिकाला एक मत देण्याचा घटनात्मक अधिकार आहे. एक सदस्यीय प्रभाग असल्यास विकास कामे सुरळीत होतात. चार सदस्यीय पद्धतीमुळे विकास खुंटला. हा बदल करण्यासाठी राज्य शासन व पालिका योग्य ती पावले उचलेल. तसेच पालकमंत्री अजित पवार योग्य तो निर्णय घेतील.- आबा बागुल, गटनेते, कॉंग्रेस====भाजपाने केलेला बदल हा चुकीचाच होता. पालिकेतील सत्ता बदल झाल्यापासून विकासकामेच झाली नाहीत. समाविष्ठ झालेल्या आणि नव्याने समाविष्ठ होणा-या गावांच्या विकासामध्ये त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. या गावांना जोडणा-या प्रभागाच्या पायाभूत सुविधांवर ताण येत आहे. रचना बदलताना नगरसेवक आणि नागरिकांच्या हरकती-सूचनांचा गांभिर्याने विचार व्हावा. राष्ट्रवादीने भाजपासारखे सत्ता डोळ्यासमोर ठेवून रचना बदलली तर विकासाला पुन्हा खीळ बसेल.- वसंत मोरे, गटनेते, मनसे====राष्ट्रवादीची पक्षीय भूमिका असू शकते. परंतू, प्रभाग रचनेत बदल केल्याने काम करणा-यांना फरक पडत नाही. लोकसंपर्क आणि चांगल्या कामाच्या जोरावरच निवडणुका जिंकता येतात. नागरिकांवर कामाचा प्रभाव असतो. त्यामुळे भाजपा नगरसेवकांनी केलेल्या कामामुळे कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. रचना बदलणे हा कामाला पर्याय असू शकत नाही.- धीरज घाटे, सभागृह नेते, पुणे महानगर पालिका====चार सदस्यीय प्रभाग असल्याने चौघांच्या निधीमधून विकास कामे झपाट्याने झाली. हीच पद्धत कायम ठेवावी. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या काळात दोनचा प्रभाग केलाच ना. प्रभाग बदलाची सुरुवात याच पक्षांनी केली. बदलाला आम्ही घाबरत नाही. धमक असेल तर एकचा प्रभाग करुन दाखवावा.- सुनिता वाडेकर, गटनेत्या, आरपीआय====भाजपाने सत्तेचा गैरवापर करुन प्रभाग रचना बदलली. परंतू, आता ही प्रभाग रचना बदलणे आवश्यक आहे. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे कामांवर परिणाम झाला असून नागरिकांच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढल्या आहेत. राजकीय फायद्यापेक्षाही नागरिकांचा फायदा लक्षात घेऊन बदल होणे आवश्यक आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी घेतलेली भूमिका योग्य असून शासन स्तरावर याबाबत योग्य ती कार्यवाही होईल.- दीपाली धुमाळ, विरोधी पक्षनेत्या

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाElectionनिवडणूकBJPभाजपा